शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती उपायांतून मिळवा स्वाईन फ्लूवर नियंत्रण

By admin | Updated: February 26, 2015 00:08 IST

राज्यभरात स्वाईन फ्लूचे थैमान आहे. घाबरून न जात घरगुती उपायांतूनही त्यावर नियंत्रण मिळविले जाऊ शकते, ....

अमरावती : राज्यभरात स्वाईन फ्लूचे थैमान आहे. घाबरून न जात घरगुती उपायांतूनही त्यावर नियंत्रण मिळविले जाऊ शकते, अशी माहिती स्वामी रामेश्वरम महाराज यांनी बुधवारी चंद्रकांत जाजोदिया यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रपरिषदेत दिली. काही महिन्यांपासून देशभरातील अनेक राज्यांमध्ये स्वाईन फ्लू आजाराने अनेकांचे बळी गेलेत. मात्र त्या दृष्टीने पाहिजे तशा उपाययोजना होत नसल्याचे आढळून आले आहे. घरगुती उपायांतून आपण स्वाईन फ्ल्यू या जिवघेण्या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो, असा विश्वास स्वामी रामेश्वरम महाराज यांनी व्यक्त केला. काय आहेत उपाय?सर्दी, खोकला व ताप ही लक्षणे आढळल्यास तुळशीची १० ते १२ पाने, काळ्या मिरचीचे १० दाणे, अद्रकाचा तुकडा, खुबकला (जडीबुटी) २ ग्रॅम, मनुका ७ ते ८ तुकडे असे मिश्रण करुन दोन ग्लास पाणी गरम करणे, पाणी निम्यापेक्षा कमी झाल्यावर त्यात चिमूटभर हळद घालावी. हे मिश्रण दिवसांतून दोन वेळा म्हणजेच सकाळी सयंकाळी घेतल्यास 'स्वाईन फ्लू' या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो.श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांनी लाल तुरटी तव्यावर गरम करून फुलवावी. जेवढी फिटकरी गरम केली, तेवढीच हळद टाकून मिश्रण करावे, हे मिश्रण दिवसातून तीनवेळा सहदासोबत चाखावे. त्यासोबतच कोवळ्या उन्हात बसणे व व्यायाम करणे, हे उपाय नियमित केल्यास स्वाईन फ्लूचे जंतू नष्ट होतात. याशिवाय वमन कर्म (गरम पाण्याचा गुराळा करणे) केल्यास पाण्यासोबत जंतू बाहेर पडू शकतात, असा सल्ला त्यांनी दिला.