शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
2
"ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
3
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
4
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
5
‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
6
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
7
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
8
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
9
पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी
10
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
11
विमानात चिनी वस्तूंना नो एन्ट्री! ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल; भेटवस्तूही डस्टबिनमध्ये फेकल्या
12
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
13
इंटरनेटवरही इराणचा टोल? समुद्राखालील ५००हून अधिक केबलमुळे डेटासेवा संकटात
14
जगभर: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवं रूप! शिक्षिकेसमोर झाले लीन
15
LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या
16
Petrol Diesel Price: पुढील ३-४ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा!
17
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
18
LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!
19
१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य प्रशासन, पंचायत विभागात खांदेपालट

By admin | Updated: May 20, 2014 23:17 IST

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन व पंचायत विभागात विविध पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांसह ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या दीडशेहून अधिक जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

अमरावती : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन व पंचायत विभागात विविध पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांसह ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या दीडशेहून अधिक जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात कार्यरत तसेच पंचायत समिती स्तरावर कार्यरत वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, अधीक्षक, कक्ष अधिकारी, परिचर, विस्तार अधिकारी (सांखिकी) अशा सुमारे शंभरहून अधिक कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्या कर्मचार्‍यांची सेवा मेळघाटात झाली नाही अशा कर्मचार्‍यांना प्रशासकीय बदलीने मेळघाटात व इतर तालुक्यात रिक्त पदानुसार पदस्थापना देण्यात आली आहे. याशिवाय पंचायत विभागांतर्गत कार्यरत असलेले जिल्ह्यातील २४ ग्रामसेवकांच्या प्रशासकीय, २0 विनंती आणि ९ ग्रामविकास अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीपात्र कर्मचार्‍यांमध्ये पती-पत्नी एकत्रिकरण, विधवा, विनंती, आपसी अश्यही बदल्या कर्मचार्‍यांच्या मागणीनुसार पूर्ण करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेत गेल्या १८ मे पासून वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचार्‍यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची कारवाई सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी पार पडलेल्या बदली प्रक्रियेला जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. डब्ल्यू. दिवाण, अरुण मोहोड आदी अधिकार्‍यांसह प्रशासकीय कामकाज हाताळण्यासाठी पंकज गुल्हाने, समीर चौधरी, अमोल कावरे, नीलेश तालन, किशोर राठोड, लिलाधर नाल्हे, अनुप टाले, पंचायत विभागाचे प्रशांत धर्माळे, श्रीकांत मेश्राम, विजय कविटकर यांनी काम पाहिले. बदली प्रक्रियेला जिल्ह्यातील बदलीपात्र कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात गर्दी केली होती. बदल्यांमुळे कर्मचार्‍यांमध्ये ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे वातावरण पहावयास मिळाले बुधवारी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचार्‍याच्या प्रशासकीय, विनंती, आपसी, बदल्या करण्यात येणार आहेत. यामध्ये आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, वरिष्ठ सहायक कनिष्ठ सहायक आदी कर्मचार्‍याचा समावेश आहे. या बदल्याकडे आरोग्यातील कर्मचार्‍याचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)