शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धेला पावणारा उजव्या सोंडेचा गणपती

By admin | Updated: September 7, 2016 00:23 IST

कामाला सुरूवात अथवा व्यापाराचा शुभारंभ करण्यापूर्वी उजव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय आजही पुढे पाऊल टाकण्याचा निर्धार कुणीही करीत नाही.

मोहन राऊत धामणगाव रेल्वे कामाला सुरूवात अथवा व्यापाराचा शुभारंभ करण्यापूर्वी उजव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय आजही पुढे पाऊल टाकण्याचा निर्धार कुणीही करीत नाही. कामगार व व्यापाऱ्यांच्या श्रद्धेचा म्हणून शहरातील जुन्या बीजीटीआय येथील पुरातन गणपती मंदिराची ही ओळख आहे़धामणगाव शहर एकेकाळी व्यापारी नगरी म्हणून ओळखले जात असत. जयरामदास भागचंद या उद्योग समूहाचे मालक भागचंद अग्रवाल यांनी १८९५ मध्ये जयपूर येथून ७ फूट उंचीची उजवी सोंडेची संगमरवरी दगडाची मूर्ती स्वत: आणून त्यांच्या इंडस्ट्रीजमध्ये प्राणप्रतिष्ठा केली होती़ सतत अखंड आठ दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून अन्नकुट केला होता़ त्यानंतर ही इंन्डस्ट्रीज नेमाणी यांना, तर त्यानंतर भारत जनरल अ‍ॅन्ड टेक्सटाईल इन्डस्ट्रीज या बिर्ला समूहाच्या उद्योगाला विकण्यात आली़ त्यावेळी कापसाकरिता प्रसिध्द असलेल्या या शहरात बिर्ला उद्योग समूहाच्यावतीने प्रसिद्ध असलेल्या या शहरात बिर्ला उद्योग समूहाच्यावतीने जिनिंग़, प्रेसिंग आॅईल व रिफाईन्डींग हे उद्योग चालविण्यात आले. येथे उत्पादित सरकीचे तेल मध्यप्रदेश व महाराष्ट्रात रेल्वे बोगीने पाठविले जायचे. त्यामुळे २ ते ३ राज्यांतील व्यापारी लघु उद्योगासाठी येत असत. येथे काम करणारे कामगार, हमाल व्यापारी उजव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेत. बीजीटीआय या उद्योग समूहाकडून राकेश खत्री यांनी ही जिनिंग खरेदी केली़ आपण या गणेशाचे दर्शन घेतल्याशिवाय कोणत्याही कार्याला सुरूवात करीत नाही, असे राकेश खत्री यांनी सांगितले़ पुरातन मंदिरात दर चतुर्थीला शहरातील भाविक आजही दर्शनाला येतात़ नवसाला पावणारा गणपती म्हणून या मूर्तीची ओळख असल्याचे संस्थाध्यक्ष शरद अग्रवाल यांनी सांगितले़