शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर होणारी पायाभूत संकलित चाचणी रद्द

By admin | Updated: December 16, 2015 00:14 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्राथमिक शाळांतून घेतली जाणारी पायाभूत संकलित चाचणी परीक्षा १ ऐनवेळी रद्द करण्यात आली.

शाळास्तरावर घेण्याचे निर्देश : निकाल लागणार उशिराअमरावती : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्राथमिक शाळांतून घेतली जाणारी पायाभूत संकलित चाचणी परीक्षा १ ऐनवेळी रद्द करण्यात आली. याआधी आॅक्टोबर २०१५ मध्ये ही परीक्षा घेण्याचे नियोजन होते. मात्र नियोजन फिस्कटल्यान दिवाळीनंतरचा मुहूर्त ठरविण्यात आला. तथापि हा मुहूर्तसुद्धा कायमचा चुकला असून राज्यस्तरावरून ही परीक्षा आता घेण्यात येणार नाही, अशी सूचना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक गोविंद नांदेडे यांनी केली आहे. या निर्णयामुळे सहामाहीचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आॅक्टोबरमध्ये प्रस्तावित असलेली संकलित मूल्यमापन - १ ही चाचणी दिवाळीनंतर घेण्यात येईल, असे कळविण्यात आले होते. असे असले तरी आता राज्यस्तरावरून ही चाचणी घेण्यात येणार नाही किंवा या परीक्षेसाठी राज्यस्तरावरून प्रश्नोत्तर पत्रिका किंवा मास्टर कॉपी पुरविण्यात येणार नाही, असे संचालकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या शाळांनी विद्या परिषदेच्या निर्देशामुळे प्रथम भाषा व गणित या विषयाची संकलित मूल्यमापन - १ ही चाचणी घेतली नसेल त्यांनी त्यांच्या सोईनुसार ही चाचणी शाळास्तरावर घ्यावी. आता राज्यस्तरावरून यंदा तीनऐवजी २ चाचण्या घेण्यात येईल, असे परिषदेने म्हटले आहे. त्याचवेळी संकलित मूल्यमापन - २ ही चाचणी शासन निर्णयानुसारच होणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रथम भाषा व गणित या विषयांची पायाभूत चाचणी जुलै २०१५ मध्ये घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले. परंतु पायाभूत चाचणीच्या प्रश्नोत्तर पत्रिका राज्य स्तरावरून पुरविण्याच्या कालावधीत तांत्रिक घोळ झाल्याने पायाभूत चाचणी सप्टेंबर,आॅक्टोबरमध्ये घेण्यात आली. अनेक ठिकाणी पायाभूत चाचणीत गैरप्रकारही झाले. संकलित मूल्यमापन - २ साठी प्रश्नपत्रिका संचच वेळेत बनणे आणि पुरवणे शक्य नसल्याने ही परीक्षाच रद्द करण्याचा मध्यम मार्ग शिक्षण विभागाने निवडल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)