मिरचीच्या नकली बियाण्याने केली शेतकऱ्यांची फसगत

By Admin | Updated: September 27, 2015 00:19 IST2015-09-27T00:19:48+5:302015-09-27T00:19:48+5:30

तालुक्यात मिरची उत्पादकांची संख्या मोठी आहे. परंतु गतवर्षी कोकड्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेताताील मिरची उखडून ...

Frozen seeds of pepper are deceived by farmers | मिरचीच्या नकली बियाण्याने केली शेतकऱ्यांची फसगत

मिरचीच्या नकली बियाण्याने केली शेतकऱ्यांची फसगत

लाखो रुपयांचे नुकसान : उत्पादकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
वरुड : तालुक्यात मिरची उत्पादकांची संख्या मोठी आहे. परंतु गतवर्षी कोकड्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेताताील मिरची उखडून फेकण्याची वेळ आल्याने लाखो रुपयांचा फटका मिरची उत्पादकांना बसला होता. विषाणू प्रतिबंधक रोगमुक्त बियाणे असल्याची बतावणी दलालांनी करून शेतकऱ्यांच्या घशात घातली. मात्र, सदर बियाणे नकली निघाल्याने प्रतवारी आणि उत्पादनसुध्दा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले. नकली बियाण्याच्या कंपनीविरुध्द मुख्यमंत्री यांचेकडे शेकडो शेतकऱ्यांनी लेखी तक्रार केली आहे.
काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे संत्रा पिकामध्येसुध्दा घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आता मिरचीकडे आगेकूच करीत मिरचीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जातात. शेकडो क्विंटल मिरची राजुरा बाजारच्या प्रसिध्द मिरची बाजारामध्ये येते. परंतु कच्चा माल असल्याने परत नेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. यामुळे मिळेल त्या भावात विकून मोकळे व्हावे लागते. रात्रीतून मिरचीची देवाणघेवाण करणारी राजुराबाजारची बाजारपेठ प्रसिध्द आहे. येथील मिरची ही दर्जेदार असल्याने परप्रांतीय बाजारपेठेतसुध्दा चांगली मागणी असते. येथून कलकत्ता, मुंबई, दिल्ली, जबलपूर, नागपूर, हैद्रबादसह राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश छत्तीसगड, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालसह देशाच्या कानाकोपऱ्यात येथून मिरची पाठविली जाते. एवढेच नव्हे तर पाकिस्तान, बांग्लादेश, दुबई, सौदी अरब राष्ट्रासह आदी देशांत येथील मिरचीला अधिक मागणी असल्याने निर्यात केली जाते. वाहतूकदारांनासुध्दा चांगली संधी मिळते.
या प्रसिध्द बाजारावरसुध्दा दिवसागणिक अवकळा येऊ लागली असून मिरची उत्पादक शेतकऱ्यांना नकली बियाणे देऊन गंडविण्याचा प्रकार पेरणीच्या वेळी घडला. यावेळी मध्यप्रदेशात नोंदणीकृत असलेल्या एका कंपनीचे मिरची बियाणे महाराष्ट्रात विकणाऱ्या दलांलानी शेतकऱ्यांना विषाणूजन्य रोगप्रतिकारात्मक बियाणे असल्याची बतावणी केली. अनेक कृषिसेवा केंद्रातसुध्दा छुप्या मार्गाने विकण्यात आले. मात्र शेतकऱ्यांना पावती मिळाली नाही. केवळ हाजरो रुपयांचे बियाणे देऊनही शेतकऱ्यांना पावती दिली नसली तरी विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी सदर बियाणे नर्सरी तयार करुन रोपटे तयार केले. लागवडी अंती सदर बियाणे हे दुसऱ्या जातीचे असल्याचे असल्यामुळे प्रतवारी मिळत नाही.
यामुळेच बाजारपेठेत सदर मिरच्यांना मागणी नसल्याने परवानाधारक व्यपाऱ्यांनीसुध्दा खरेदी करणे बंद केले. याचा परिणाम मिरची उत्पादक शेतकऱ्यावर झाला असून लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

Web Title: Frozen seeds of pepper are deceived by farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.