शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये ‘पदवीधर’ उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी

By admin | Updated: March 26, 2016 00:09 IST

विधान परिषद अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पाच महिन्यांनंतर होऊ घातली आहे.

चाचपणी : खोडके, चौधरी, मेटकर ही नावे आघाडीवरअमरावती : विधान परिषद अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पाच महिन्यांनंतर होऊ घातली आहे. काँग्रेसने पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी निश्चित केली नसली तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी बुधवारी मुंबईत त्याअनुषंगाने पदाधिकारी तथा इच्छूक उमेदवारांची बैठक घेतली. यात काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके, भय्या मेटकर, लतिफ देशमुख आणि भाजपचे अविनाश चौधरी, बुलडाणा येथील अशोक आंबेकर, समीर नागोळे यांनी मुलाखती दिल्यात.अमरावती पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे करीत आहेत. राज्यमंत्र्यांच्या विरोधात अमरावती पदवीधर मतदारसंघात लढाई असल्यामुळे काँग्रेसने आतापासून सावध पावले टाकायला प्रारंभ केला आहे. ना. पाटील यांचा पराभव करण्याची ताकद असलेल्या व्यक्तीला काँग्रेसची उमेदवारी दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. संजय खोडके हे गत सहा महिन्यांपासून पदवीधर मतदार संघ लढविण्याची तयारी करीत आहे. तसेच भाजपचे पदाधिकारी असलेले अविनाश चौधरी हेदेखील मुंबई येथील काँग्रेस कार्यालयात दाखल झाल्याने उपस्थितांच्या भुवय्या उंचावल्या होत्या. भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याची जाणीव अविनाश चौधरी यांना झाल्यामुळे त्यांनी काँग्रेसचा ‘हात’ पकडण्याची तयारी चालविली आहे. तर विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य भय्यासाहेब मेटकर हे देखील काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. दरम्यान काँगे्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी इच्छूक उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले. ना. पाटील यांचा अमरावती पदवीधर मतदारसंघात कसा पराभव करता येईल, या विषयावर काँग्रेसने मंथन केले. ना. पाटील यांना भाजपात अंतर्गत विरोध असला तरी तो कसा ‘कॅश’ करता येईल. त्याकरिता काँग्रेसची उमेदवारी कोणाला दिली पाहिजे, याअनुषंगाने चर्चा करण्यात आली. बैठकीला खा. अशोक चव्हाण यांच्यासह माजी मंत्री वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर, माजी आ.रावसाहेब शेखावत, काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक गणेश पाटील, छाया दंडाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय अकर्ते, अक्षय भुयार, शाम गायगोले, अमोल इंगळे, ऋषी मेटकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)