शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमीतून दरवळणार निशिगंधा मोगर्‍याचा सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:11 IST

अमरावती : शेतकरी आर्थिकरीत्या बळकट व्हावा यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्य शासनाच्या कृषी आयुक्तालयाने फळपीक ...

अमरावती : शेतकरी आर्थिकरीत्या बळकट व्हावा यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्य शासनाच्या कृषी आयुक्तालयाने फळपीक लागवडीसाठी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे शिवारात निशिगंधा मोगऱ्यासह गुलाबाचा सुगंध दरवळण्यास मदत होणार आहे.

एका वर्षाकरिता प्रतिहेक्‍टर दोन लाख रुपयांचे अनुदान देय राहणार आहे. फुलपिके लागवडीचा कालावधी १ जून ते ३० नोव्हेंबरपर्यंत राहील. या महत्त्वकांक्षी निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. अनेक वर्षापासून रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड केली जात आहे. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून फूल लागवडीसाठी रोजगार हमी योजनेतून मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत होती. याची राज्य शासनाने दखल घेतली असून या योजनेतून निशिगंधा, मोगरा गुलाबांची लागवड करून फुलशेती केली जाणार आहे. संचालक फलोद्यान यांच्यामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर विभागाकडून या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याकरिता क्षेत्रीय स्तरावर कारवाईची सूचना दिली आहे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी लाभार्थींची निवड क्षेत्रीय स्तरावर करावी. फुलपीक लागवड कार्यक्रमामुळे वैयक्तिक लाभार्थ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. मग्रारोहयोसाठी जॉब कार्डवरील प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. याकरिता लाभार्थ्यांच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे.

बॉक्स

ग्रामसभेची घ्यावी लागणार मंजुरी

फुल पिकाच्या लागवडीसाठी ग्रामपंचायत ग्रामसभेची मान्यता आवश्यक आहे. लाभार्थी निवडीची कारवाई दरवर्षी एप्रिलअखेर पूर्ण करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करावी लागणार आहे. कामाचे नियोजन करताना कृषी व संलग्न कामे ६० टक्के घेतले जातील. याची दक्षता घ्यावी लागणार आहे. एका वर्षाकरिता प्रति हेक्‍टरी दोन लाख रुपये एवढे अनुदान देय राहील. फुलबाग लागवडीसाठी कृषी सहायक तांत्रिक मार्गदर्शन करतील. या योजनेंतर्गत तांत्रिक मंजुरीचे अधिकार तालुका कृषी अधिकारी व प्रशासकीय मंजुरीचे अधिकार उपविभागीय कृषी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे.