ट्रक-बसची समोरासमोर धडक; चार ठार, १२ गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 18:12 IST2021-12-01T17:27:57+5:302021-12-01T18:12:39+5:30

नरखेड गावलगत प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. यामधे बसमधील चार प्रवासी जागीच ठार झाले, तर १२ जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

Four killed and 12 seriously injured in truck-bus collision on Pattan-Multai road | ट्रक-बसची समोरासमोर धडक; चार ठार, १२ गंभीर जखमी

ट्रक-बसची समोरासमोर धडक; चार ठार, १२ गंभीर जखमी

ठळक मुद्देपट्टण-मुलताई मार्गावरील घटना

अमरावती : वरूड येथून ३० किमी अंतरावर मध्य प्रदेशातील पट्टण-मुलताई मार्गावर नरखेड गावलगत प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. यामधे बसमधील चार प्रवासी जागीच ठार झाले, तर १२ जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

पोलीस सूत्रांनुसार, बुधवारी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान मध्य प्रदेशातील तिवरखेड येथून पट्टण मार्गे मुलताईला जाणाऱ्या खासगी प्रवासी बस (एमएच ३१ सीजी ४४१९) ला मुलताईकडून पट्टणकडे धान्य घेऊन येणाऱ्या ट्रकने (एमपी ४८ एच ०६१९) जोरदार धडक दिली. या अपघातात बसचा चुराडा झाला, तर ट्रक उलटून रस्त्याच्या कडेला पडला.

या भीषण घटनेत बसमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर १२ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मृत आणि जखमींची नावे वृत्त लिहिस्तोवर कळू शकली नाही. ट्रकचा चालक व वाहक फरार झाले असून जखमींना मुलताई पोलीस आणि नागरिकांनी मुलताई रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Four killed and 12 seriously injured in truck-bus collision on Pattan-Multai road