शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

भीषण आगीत चार घरे खाक

By admin | Updated: February 23, 2017 00:13 IST

अचानक लागलेल्या भीषण आगीत जळका हिरापूर गावातील चार घरे जळून खाक झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

लाखोंचे नुकसान : जळका हिरापूर येथील घटना अमरावती : अचानक लागलेल्या भीषण आगीत जळका हिरापूर गावातील चार घरे जळून खाक झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत चार गावकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली. भातकुली तालुक्यातील नया अकोला रोडवरील जळका हिरापूर येथे दुपारच्या सुमारास एका घराला आग लागली. आगीने काही वेळात भिषण रुप धारण केल्यामुळे काही वेळात आगीने अशोक गोपाळ भुसारी, नरेंद्र भुसारी, गोवर्धन देशमुख व रामचंद्र वाकोडे यांच्या घराला विळख्यात घेतले. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे वाहनचालक फाईक खान, फायरमन किशोर शेंडे, शिवा आडे व हजारे यांनी पाण्याचे बंब घेऊन घटनास्थळ गाठले. त्यांनी पाण्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केल्यानंतर तब्बल दिड तासाने आग नियंत्रणात आली. या घटनेमुळे वलगाव परिसरात खळबळ उडाली होती. आगीची माहिती गावखेड्यात पसरताच शेकडो नागरिकांनी जळका हिरापुर गावात बघ्याची गर्दी केली. रोहनखेडमध्ये घर, टोलनाक्यावर कार जळालीनांदगाव पेठजवळील रोहनखेड गावात बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सुरेश अंबाडेकर यांच्या पडीत घरातील कडबा-कुटाराला अचानक आग लागली. आगीने भीषण रुप धारण करून अंबाडेकर यांच्या घरालाही विळख्यात घेतले होते. तर नांदगाव पेठ टोल नाक्याजवळ उभ्या असलेल्या कार (एमएच २७/एसी/८०२४)ने अचानक पेट घेतला. यात ती कार भस्मसात झाली. मंगेश नागमोते यांची ती कार होती.