शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बेमुदत कामबंद संपामुळे वनाची सुरक्षा अधांतरी

By admin | Updated: August 26, 2014 23:03 IST

राज्यभरातील वनरक्षक, वनपाल व वनमजुरांनी बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केल्याने वनाची सुरक्षा अधांतरी आहे. जंगलाचे संरक्षण करण्याकरिता स्वत: अधिकाऱ्यांनाच लक्ष दावे लागत आहे.

अमरावती : राज्यभरातील वनरक्षक, वनपाल व वनमजुरांनी बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केल्याने वनाची सुरक्षा अधांतरी आहे. जंगलाचे संरक्षण करण्याकरिता स्वत: अधिकाऱ्यांनाच लक्ष दावे लागत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.राज्यभरातील वनरक्षक, वनपाल व वनमजूर यांच्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या मागण्या पूर्ण करण्याकरिता शासनस्तरावर अनेकदा प्रयत्न केले गेले मात्र आजपर्यंत मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे वनरक्षक, वनपाल व वनमजूर यांनी २५ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सुमारे १५०० वनरक्षक, वनपाल व वनमजूरांचा सहभाग आहे. त्यामुळे जंगलांच्या संरक्षणाविषयी मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खऱ्या अर्थाने जंगलाचे संरक्षण करण्यात सर्वाधिक सहभाग वनरक्षक, वनपाल व वनमजुरांचा आहे. मात्र तरीसुध्दा शासनाकडून या वनकर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, ही एक शोकांतिका आहे. या बेमुदत संपामुळे जंगलाची सुरक्षा वाऱ्यावर आली असून आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच जंगलात जाऊन देखरेख करावी लागत आहे. बेमुदत संपामुळे जंगलाच्या सुरक्षा करण्याकरिता एकही कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे वरिष्ठ अधिकारी चिंतेत पडले आहे. यावर उपाययोजना म्हणून रोजंदारीवर नियुक्ती करण्यात येत आहे. त्यातच स्वत: अधिकाऱ्यांनाच आपआपल्या वनपरिक्षेत्रामध्ये जातीने लक्ष द्यावे लागत आहे. डे-नाईट सेवा देऊन जंगलाचे संरक्षण केले जात असल्याचे वनाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांच्या संप काळातील केलेल्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)