शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाला बिबट्या पावला; ५६० कोटींचे पॅकेज; १८०० बिबटे ठेवण्यासाठी जंगलात रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 10:10 IST

बिबट्याला वन्यप्राणी अनुसूची १ मधून २ मध्ये टाकण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे ठरले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी  योजनेतून बिबट प्रवण क्षेत्रातील घरे, गोठे, शाळा, दवाखाने आदी भोवताली सौर ऊर्जा कुंपण उभारण्यात येणार आहे.

गणेश वासनिक

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : राज्यात सध्या २९ जिल्ह्यांमध्ये  बिबट्याने उच्छाद मांडला असून त्याच्या हल्ल्यात अनेकांचे प्राण गेले आहेत.  बिबटे व मानव संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाला ५६० कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात १८०० बिबटे ठेवण्यासाठी जंगलात रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार आहेत.

बिबटे व मानव संघर्ष आता नैसर्गिक आपत्ती ठरणार.

महाराष्ट्रात चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, नाशिक, अहिल्यानगर, बुलढाणा, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये बिबटे आता मानवी वस्त्यांमध्ये शिरत असल्याने  शासन अस्वस्थ झाले आहे. बिबट्यांचे वाढते हल्ले विचारात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये वरिष्ठ वनाधिकारी, सचिव, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, वित्त सचिव, महाव्यवस्थापक विद्युत वितरण यांच्या समवेत बैठक घेतली. त्यांनी परिस्थिती हाताळण्याचे निर्देश दिले.

सौर कुंपणाची तरतूद

बिबट्याला वन्यप्राणी अनुसूची १ मधून २ मध्ये टाकण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे ठरले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी  योजनेतून बिबट प्रवण क्षेत्रातील घरे, गोठे, शाळा, दवाखाने आदी भोवताली सौर ऊर्जा कुंपण उभारण्यात येणार आहे.

 मानवावर हल्ले करणाऱ्या बिबट्यांना नरभक्षक ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत ५ डिसेंबर २०२५ रोजी विशेष कार्य अधिकारी उदय ढगे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

१८०० बिबटे बंदिस्त होणार रॅपिड रेस्क्यू युनिटही वाढले

नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ६०० बिबटे बंदिस्त करण्यासाठी तत्काळ रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार आहे.

वन विभागाच्या जागेवर वनक्षेत्रात तीन जिल्ह्यांमध्ये १८०० बिबटे ठेवण्याची सोय केली जाणार आहे.वेळ पडल्यास रेस्क्यू सेंटरची संख्या अन्य जिल्ह्यांमध्ये वाढवली जाणार आहे.

याशिवाय रॅपीड रेस्क्यू युनिटच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. त्यामुळे वन विभागात प्रथमच रॅपीड युनिटची स्थापना केली जाणार आहे.

नैसर्गिक आपत्ती ठरणार

बिबटे आणि मानव संघर्ष वाढल्याने मानव हानी व पशुधन, शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत.

वाढते बिबट हल्ले लक्षात घेता ‘राज्य नैसर्गिक आपत्ती’ घोषित करण्यासंदर्भात वन व मदत पुनर्वसन विभागाला अभिप्राय देण्याचेही निर्देश दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard relief for forest dept; ₹560Cr package; rescue centers planned.

Web Summary : Maharashtra allocates ₹560Cr to mitigate leopard-human conflict, exacerbated across 29 districts. Rescue centers in Pune, Ahilyanagar, and Nashik will house 1800 leopards. The government considers declaring conflicts as natural disasters, implementing solar fencing, and increasing rapid rescue units to manage the escalating situation.