शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पुसनेर ग्रामपंचायतीने फुलविली फळबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:11 IST

लिंबू, करवंद, शेवगा, सीताफळ, पेरू, जांभूळ, चिंच वृक्षाचा समावेश नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील पुसनेर ग्रामपंचायतीने गावातील दहा एकर ई-क्‍लास ...

लिंबू, करवंद, शेवगा, सीताफळ, पेरू, जांभूळ, चिंच वृक्षाचा समावेश

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील पुसनेर ग्रामपंचायतीने गावातील दहा एकर ई-क्‍लास जमिनीवर लिंबू, करवंद, शेवगा, सीताफळ, पेरू, जांभूळ, चिंच आदी फळे देणाऱ्या वृक्षांसह बांबू, कडुलिंब,पिंपळ,वड व इतर प्रजातीच्या सुमारे चार हजार वृक्षांची लागवड केली आहे.

ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढावे, या हेतुने ही फळबाग लावण्यात आली असून, विविध प्राण्यांच्या, पक्षांच्या निवाऱ्यासाठी जैवविविधतेनुसार बऱ्याच वृक्षांची लागवड येथे करण्यात आली आहे. या फळबागेतील झाडे आता चार वर्षांची झाली असून, यातील लिंबू व करवंदाची फळे गावकऱ्यांना चाखायला मिळत आहेत.

नरेगाच्या मदतीने व ग्रामपंचायतीमधील चौदाव्या वित्त आयोगामधून तसेच सामान्य निधीमधून या वृक्षाच्या संगोपनाची व पाण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर, सहायक गटविकास अधिकारी विठ्ठल जाधव यांचे यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

वृक्षलागवडीसाठी पुसनेर ग्रामपंचायतचे सरपंच मदन काजे, उपसरपंच प्रफुल्ल खडसे, स्वयंसेवी संदीप काजे, ग्रामरोजगार सेवक रवि काजे, सुलतानपूरचे पोलीस पाटील पंकज काजे, सचिव विक्रम पिसे, चंदन गिरी व गावकऱ्यांचे मोलाचे योगदान आहे.

या गावाने हगणदरीमुक्त गाव, सन २०१८ ते २०२० सलग दोन वर्षे शंभर टक्के कर वसुली, वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांकाचे बक्षीस, आर.आर. पाटील सुंदर ग्राम योजनेत तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे पुरस्कार पटकाविले आहे.

-------------

ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढावे, या हेतुने गावातच फळबाग निर्माण केली. त्यासाठी ग्रामस्थांची साथ लाभली.

- मदन काजे, सरपंच पुसनेर.