शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

देहविक्रय करणाऱ्या पाच तरूणींना अटक

By admin | Updated: February 25, 2016 00:05 IST

देहविक्री व्यवसायातील पाच तरुणींसह एक एजन्ट महिला व एका युवकास पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली.

महिला एजंटसह युवकही ताब्यात : आनंदवाडी कॉलनीतील रहिवासी संकुलातील घटनाअमरावती : देहविक्री व्यवसायातील पाच तरुणींसह एक एजन्ट महिला व एका युवकास पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली. कठोरा नाका परिसरातील आनंदवाडी कॉलनीतील एका फ्लॅट सिस्टीममध्ये हा व्यवसाय सुरु होता. दोन एजन्ट महिलांनी एक महिन्यापूर्वी आनंदवाडी कॉलनीत एका तीन मजली फ्लॅट सिस्टीमध्ये फ्लॅट भाडेतत्वावर घेतला. तेथे पाच तरुणींमार्फत देहविक्रीचा व्यवसाय सुरु केला. हा प्रकार काही दिवसांपूर्वी परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला होता. देहविक्री होत असल्याची माहिती पोलीस विभागाला दोन दिवसांपूर्वीच मिळाल्याने पोलिसांनी आनंदवाडी परिसरातील त्या फ्लॅटवर लक्ष केंद्रीत केले. देहविक्री होत असल्याची शहानिशा झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एका पंटरला ग्राहक बनवून फ्लॅटमध्ये पाठविले. एकाने फ्लॅटच्या गॅलरीतून टाकली उडीगुप्त माहितीवरून पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, महिला सेलच्या पोलीस निरीक्षक नीलिमा आरज, एपीआय संजीवनी थोरात, दोन महिला पोलीस, पोलीस शिपाई वाटाणे, नरवणे, दीपक खानीवाले, अक्षय देशमुख, अमोल आदींनी आनंदवाडी कॉलनीतील फ्लॅटमध्ये धाड टाकली. यावेळी तेथील फ्लॅटमध्ये उपस्थित असणारा आरोपी अतुल इंगळेने पसार होण्यासाठी गॅलरीतून बाहेर उडी मारली. मात्र, फ्लॅटखाली उभे असणाऱ्या पोलिसांनी इंगळेला पकडले. त्याचप्रमाणे पाच तरुणींपैकी दोघींनीसुध्दा गॅलरीतून उडी टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, महिला पोलीस शिपायांनी त्यांना पकडले.‘त्या’ तरुणी विविध शहर-राज्यातीलदोन एजन्ट महिला पाच तरुणींकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होत्या. चंद्रपूर, गुजरात, धामणगाव व दोन मुली अमरावतीमधील असल्याची कबुली त्या तरुणींनी पोलिसांना दिली.