आधी लग्नाच्या आणाभाका दिल्या, प्रेमात ओढून केले लैंगिक शोषण; नकार देत दिली आत्महत्येची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 19:50 IST2025-12-25T19:49:12+5:302025-12-25T19:50:45+5:30
Amravati : शहर आयुक्तालयात जानेवारी ते २३ डिसेंबरपर्यत लैंगिक अत्याचाराबाबतचे तब्बल ५० एफआयआर नोंदविण्यात आले. त्यातील अनेक एफआयआर हे शून्य एफआयआर म्हणून येथील पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आले.

First promised marriage, then sexually abused her by making her fall in love; then refused and threatened to commit suicide
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील एका २५ वर्षीय तरुणीला प्रेमजाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. मात्र तिने लग्नाचा तगादा लावला असता त्याने 'तो मी नव्हेच' चा पवित्रा घेतला. तथा आत्महत्या करण्याची धमकी दिली. जुलै २०२३ ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान ती लैंगिक अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी २३ डिसेंबर रा. कठोरा नाका रोड, अमरावती) रोजी आरोपी हरीश सुरेंद्र झारखंडे (२४, याचेविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. संशयित आरोपी हरीश झारखंडे याने महेंद्र कॉलनी भागातील त्या २५ वर्षीय तरुणीला प्रेम जाळ्यात ओढले. तिला वेळोवेळी लग्नाचे प्रलोभन दिले. तिला आणाभाका दिल्या. पुढे जुलै २०२४ ते लग्नाच्या नोव्हेंबर २०२५ या दीड वर्षाच्या कालावधीत तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिचेसोबत जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर तिने लग्नाचा तगादा लावला असता त्याने साफ नकार देऊन मी लग्न करू शकत नाही, असे तिला बजावले. तू माझी फसवणूक केली आहे, त्यामुळे मी पोलिसांत तक्रार देते, असे तिने बजावले. त्यावर आरोपीने तू तसे केल्यास मी माझ्या जीवाचे बरे वाईट करेन, असे म्हणत आत्महत्येची धमकी दिली. अखेर त्या तरुणीने २३ डिसेंबर रोजी राजापेठ पोलीस स्टेशन गाठून त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदविली.
अत्याचाराची पन्नासी
शहर आयुक्तालयात जानेवारी ते २३ डिसेंबरपर्यत लैंगिक अत्याचाराबाबतचे तब्बल ५० एफआयआर नोंदविण्यात आले. त्यातील अनेक एफआयआर हे शून्य एफआयआर म्हणून येथील पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आले. ते घटनास्थळ असलेल्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. गतवर्षी याच कालावधीत तो आकडा ४९ असा होता. तर यंदा शहर आयुक्तालयात विनयभंगाचे तब्बल १७८ एफआयआर नोंदविले गेले. गतवर्षी याच कालावधीत ती संख्या १४० अशी होती.
अल्पवयीन मुली टार्गेट, सोशल मीडियाही कारण
अत्याचाराच्या ज्या ५० प्रकरणात एफआयआर नोंदविण्यात आले. त्यातील ५० ते ६० टक्के पिडिता या अल्पवयीन आहेत. सोशल मिडियाचा अतिवापर व अतिरेकदेखील त्या घटनांना कारणीभूत ठरला आहे.