शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची पहिली यादी जाहीर; धामणगाव प्रताप अडसड, अचलपुरातून प्रवीण तायडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 12:20 IST

Amravati : अमरावतीत भाजपच्या वाट्याला जागा किती?; इच्छुक अन् पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. त्याअनुषंगाने भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीने रविवारी राज्यातील ९९ मतदारसंघांतून उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात अमरावती जिल्ह्यातून धामणगाव रेल्वे प्रताप अडसड, तर अचलपुरातून प्रवीण तायडे या दोघांची नावे आहेत. त्यानिमित्ताने भाजपने आमदार प्रताप अडसड यांच्यावर धामणगावातून पुन्हा विश्वास टाकला आहे, तर अचलपुरातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तायडे यांच्या रूपाने नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. 

अमरावती जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ असून, भाजपने आठही मतदारसंघांतून तयारी चालविली आहे. मात्र, रविवारी जाहीर झालेल्या उमेदवाऱ्यांच्या यादीत केवळ दोनच नावे असल्याने जिल्ह्यातील भाजपत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अचलपूर, धामणगाव रेल्वेसह तिवसा, मेळघाट, दर्यापूर, मोर्शी व अमरावती या हक्काच्या जागा भाजपला हव्या होत्या. तशी मागणी वरिष्ठांकडे अमरावती जिल्ह्यातील नेत्यांनी केली होती; परंतु ९९ उमेदवारांच्या यादीत केवळ दोन नावे जाहीर झाल्याने उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेल्या भाजपच्या इच्छुकांना 'जोर का झटका धीरे से' मानला जात आहे भाजपच्या वाट्याला येणाऱ्या परंपरागत तिवसा आणि मेळघाट या दोन मतदारसंघांतून भाजपने पहिल्या यादीत उमेदवार जाहीर न केल्यामुळे 'कुछ तो गडबड है' असे बोलले जात आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवार व त्यांचे पाठीराखे संभ्रमात आहेत.

' चार मतदारसंघांतून मतदान, पुढे काय? विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अचलपूर, धामणगाव रेल्वे, मेळघाट, दर्यापूर या चार मतदारसंघांतून उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी मोजक्याच पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. प्रदेश भाजपने विधनासभानिहाय मतदार यादीदेखील पाठविली होती. यात थेट निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निरीक्षकही नेमले होते. मात्र, रविवारी भाजपने उमेदवारांची नावे जाहीर करताना तिवसा, मेळघाटचा समावेश दिसून आला नाही. त्यामुळे भाजपने उमेदवारांबाबत निवडणूक प्रक्रिया राबविली ते वास्तव जाणून घेण्यासाठी की केवळ खानापूर्ती होती, असा सवाल उपस्थित होत आहे.

महायुतीतून 'त्या' जागा मित्रपक्षाकडेच... महायुतीने जागा वाटपाच्या ठरविलेल्या फॉर्म्युलानुसार शिंदेसेना, अजित पवार राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळतील, हे भाजपच्या यादीने स्पष्ट केले आहे. अमरावती, मोर्शी मतदारसंघ अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याचे संकेत आहेत, तर दर्यापूर, मेळघाट या दोन मतदारसंघावर शिंदेसेनेने दावा केला आहे. बडनेरा मतदारसंघ हा युवा स्वाभिमान पार्टीला सोडला जाणार असे निश्चित झाले आहे. तिवसा मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपाअंतर्गत रस्सीखेच सुरू असून, मेळघाट विधानसभा मतदारसंघाविषयी अद्यापही तोडगा निघालेला नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amravatiअमरावतीdhamangaon-railway-acधामणगाव रेल्वेachalpur-acअचलपूरBJPभाजपा