शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
4
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
5
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
6
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
7
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
8
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
9
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
10
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
11
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
12
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
13
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
14
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
15
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
16
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
17
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
18
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
19
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
20
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
Daily Top 2Weekly Top 5

आगीत चार घरे भस्मसात

By admin | Updated: July 1, 2015 00:40 IST

तालुक्यातील वणी (बेलखेड) येथे अचानक लागलेल्या आगीत चार घरे जळून भस्मसात झाली.

वणी येथील घटना : बियाण्यांसह नऊ हजारांची रोकड खाकचांदूरबाजार : तालुक्यातील वणी (बेलखेड) येथे अचानक लागलेल्या आगीत चार घरे जळून भस्मसात झाली. यात घरातील साहित्य, बी-बियाण्यांसह नऊ हजारांच्या नोटाही जळून खाक झाल्या. ही आग सकाळी ११ वाजताच्या सुमारास लागली. आग लागल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य मंगेश देशमुख यांनी चांदूरबाजार अग्निशमन विभाग व पोलिसांना दिली. मात्र अग्निशमन वाहन घटनास्थळावर येण्यापूर्वीच गावकऱ्यांनी सामूहिकरीत्या या आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर अग्निशमन यंत्रणा घटनास्थळावर आली आणि त्यांनी आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. आगीत भस्मसात झालेल्या चार घरांपैकी दोन घरांत गॅस सिलिंडर होते. गावकऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ही दोन्ही सिलिंडर बाहेर काढण्यात यश मिळविले. अन्यथा या ठिकाणी मोठा स्फोट होण्याची शक्यता टळली. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मिळताच ब्राम्हणवाडा थडी पोलीस चौकीचे जमादार मडावी व तलाठी मानकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून नुकसानीचा अहवाल सादर केला. या आगीत रंगराव धनसांडे यांच्या घरातील धान्य, कपडे, बियाणे व इतर साहित्यासह तीन हजाराच्या नोटा जळून खाक झाल्या. याच्या ४ जणाचे कुटूंब बेघर झाले आहे. शिवदास शेळके यांच्या घरातील धान्य व बियाणासह सर्व साहित्य जळून खाक झाले. गुंफा धनसांडे यांचेही ४ जणाचे कुटूंब उघड्यावर आले आहे. याच्या घरातील सहा हजाराच्या नोटा जळून खाक झाल्या आहेत.संध्या शेळके यांच्या घरातील धान्य, कांदा, कपडे व बियाणासह ३ जणाचा संसार उघड्यावर आला आहे. आगीमध्ये जळालेल्ळा मालमत्तेचा पंचनामा सरपंच सूरज चव्हाण, पोलीस पाटील अमोल ठाकरे, सचिव देशमुख, ग्रा. पं. सदस्य मंगेश देशमुख यांचे उपस्थितीत तलाठी मानकर, जठार यांनी केला. (ता. प्रतिनिधी)