अखेर दोन बीटी बियाणे कंपन्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा, आसेगाव ठाण्यात तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 06:49 PM2017-11-28T18:49:14+5:302017-11-28T18:49:31+5:30

जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील सात शेतक-यांना कंपनीने नमूद केल्यानुसार बियाणे दिलेले नाहीत, यामुळेच दोन बीटी बियाणे कंपनीविरूद्ध आसेगाव ठाण्यात सोमवारी उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

Finally, a case of cheating against two BT seed companies, complaint against Asegaon Thane | अखेर दोन बीटी बियाणे कंपन्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा, आसेगाव ठाण्यात तक्रार 

अखेर दोन बीटी बियाणे कंपन्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा, आसेगाव ठाण्यात तक्रार 

googlenewsNext

अमरावती : जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील सात शेतक-यांना कंपनीने नमूद केल्यानुसार बियाणे दिलेले नाहीत, यामुळेच दोन बीटी बियाणे कंपनीविरूद्ध आसेगाव ठाण्यात सोमवारी उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 
बीटी बियाणे कंपन्यांनी नमूद केलेल्या धोरणाप्रमाणे शेतक-यांना बियाण्यांची विक्री केलेली नाही. त्यामुळे कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला व शेतक-यांचे प्रति एकर सव्वा लाख रूपयांचे नुकसान झाले. त्यामुळे भातकुलीचे तालुका कृषी अधिका-याद्वारा सोमवारी सायंकाळी कृषी विभागाच्यावतीने आसेगाव ठाण्यात बियाणे कंपनीविरुद्ध कारवाई करावी, अशी तक्रार दाखल करण्यात आली. या  आधारे कावेरी व अजित सिड्स या दोन  बीटी बियाणे कंपनीविरुद्ध भादंवी ४२० व कलम १३ महाराष्ट्र सिड्स अ‍ॅक्ट २००९ अन्वये गुन्हा नोंदविला. मंगळवारी दुपारी आसेगाव पोलिसांनी पूर्णानगत तेथील सात शेतकºयांच्या बाधित पिकाचा पंचनामा केला

बियाणे कंपन्यांविरूद्ध विदर्भातील दुसरी तक्रार
जिल्हा समितीच्या अहवालात ९६ टक्के बोंडे किडली असल्याने किमान एक लाख २५ हजारांचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. याविषयीची पहिली तक्रार अकोला येथे, तर दुसरी तक्रार आसेगाव ठाण्यात कृषी विभागाच्यावतीने दाखल झालीे. विभागात आठ लाख हेक्टर क्षेत्र बाधित असल्याने त्या शेतक-यांना न्याय व नुकसान भरपाई केव्हा, असा शेतकºयांचा सवाल आहे.

बुधवारी पुण्याला कृषी आयुक्तांनी बैठक बोलाविलीे. यामध्ये विभागातील बीटी कपाशीच्या नुकसानीची स्थिती सादर करणार आहोत. या बैठकीत शेतक-यांना दिलासाजनक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.
- सुभाष नागरे,
कृषी सहसंचालक

Web Title: Finally, a case of cheating against two BT seed companies, complaint against Asegaon Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा