शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

'टाकी फुल्ल करा' दरवाढीच्या भीतीपोटी पंपांवर लागल्या रांगा; इराण-इस्रायल युद्धामुळे दर वाढतील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:33 IST

Amravati : इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे सामान्य जनतेला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे सामान्य जनतेला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याच्या भीतीने शहर आणि ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर वाहनचालकांची मंगळवार ३ मार्च रोजी रात्री दुचाकी व चारचाकी वाहनधारकांनी पेट्रोल पंपांवर अक्षरशः रेटारेटी केली. ही गर्दी अचानक उसळली नाही. तर, इंधन दरात वाढ होणार असल्याची अफवा वेगाने पसरल्याने नागरिक मोठ्या संख्येने पेट्रोल भरण्यासाठी घराबाहेर पडले.

युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढणार आणि मध्यरात्रीपासूनच देशातील पेट्रोल-डिझेल महागणार, या चर्चेने अमरावतीकरांमध्ये खळबळ उडाली. मात्र, आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ होणार, या केवळ अफवा आहेत. मात्र सोशल मिडियांमधील पोस्टमुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या तरी पेट्रोल, डिझेलच्या दरात कुठलीही दर वाढ होणार नाही. अजून काही महिने पुरेल, इतका तेलसाठा देशात उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावू नयेत,' असे आवाहन अमरावती जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनने केले आहे. संभाव्य दरवाढीपासून वाचण्यासाठी अनेकजण मिळेल तितके इंधन भरण्याचा प्रयत्न वाहनधारक करत होते. यामुळे तात्पुरता गर्दीची परिस्थिती निर्माण झाली होती. बुधवारी सायंकाळी सात वाजतापासून पंपावर पुन्हा वाहनांच्या रांगा लागल्या.

अनेकांनी दुचाकीच्या टाक्या केल्या फुल्ल

रात्री बारापासूनच पेट्रोलच्या किमतीत लिटरमागे ५ ते १० रुपयांनी मोठी वाढ होणार आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे आता गाडी फुल्ल करून घ्यायची आहे,' अशा प्रतिक्रिया उमटल्या. मंगळवारी रात्री १२ पर्यंत दुचाकी आणि चारचाकी गाड्या घेऊन अनेकांनी थेट पेट्रोल पंपांकडे धाव घेतल्याचे दिसून आले. मोर्शी रोड, नवसारी, इर्विन चौकातील पंपावर रांगा पाहायला मिळाल्या.

पेट्रोल, डिझेलचे दर किती ?

सध्या अमरावती पेट्रोल सुमारे १०५ रुपये ११ पैसे प्रतिलिटर, तर डिझेल ९१.६५ रुपये प्रतिलिटरच्या दराने मिळत आहे.

"जिल्ह्यात सध्यास्थितीत पुरेसा पेट्रोल, डिझेलचा साठा आहे. नागरिकांनी याबाबतच्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये."- संतोष काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी

"युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, पेट्रोल दरवाढ होण्याची सध्यातरी कुठलीही शक्यता नाही. आपल्याकडे चार महिने पुरेल इतका इंधनाचा साठा उपलब्ध आहे. पेट्रोलची टंचाई भासणार नाही. नागरिकांनी कुठल्याही दरवाढीच्या अफवावर विश्वास ठेवू नये, जिल्ह्यात सर्व पेट्रोलपंप नियमित सुरू आहेत."- सौरभ जगताप, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशन

English
हिंदी सारांश
Web Title : Panic Buying at Pumps: Iran-Israel War Fuels Price Hike Fears

Web Summary : Rumors of rising fuel prices due to the Iran-Israel conflict triggered panic buying in Amravati. Residents rushed to petrol pumps, fearing price hikes. The Petrol Dealers Association assured sufficient stock and dismissed the rumors, urging people not to panic.
टॅग्स :Petrolपेट्रोलIranइराणIsraelइस्रायलWarयुद्धAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र