शिक्षकांच्या हक्कासाठी पोटतिडकीचा लढा- शेखर भोयर

By Admin | Updated: June 14, 2014 01:19 IST2014-06-14T01:19:29+5:302014-06-14T01:19:29+5:30

शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत सभागृहात आमदारांनी मौन बाळगल्याने शिक्षण क्षेत्र समस्येच्या खाईत ढकलले गेले आहे.

The fight for the rights of the teacher: Shekhar Bhoyar | शिक्षकांच्या हक्कासाठी पोटतिडकीचा लढा- शेखर भोयर

शिक्षकांच्या हक्कासाठी पोटतिडकीचा लढा- शेखर भोयर



अमरावती : शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत सभागृहात आमदारांनी मौन बाळगल्याने शिक्षण क्षेत्र समस्येच्या खाईत ढकलले गेले आहे. शिक्षकांचे अस्तित्व

धोक्यात आले आहे. शिक्षकांच्या हक्कासाठी पोटतिडकीने प्रयत्न करुन प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचे आश्वासन शेखर भोयर यांनी शिक्षकांना दिले.
ते अकोला येथे प्रचार दौऱ्यादरम्यान शिक्षकांशी संवाद साधत होते.
गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या स्वयंअर्थसहाय्यिता विधेयक तसेच शिक्षण हक्क कायदा आर.टी.ई. २००९ ची अंमलबजावणी करताना

परिस्थितीनुसार शिक्षक प्रतिनिधींनी बदल सुचविले नाहीत. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झाली असून या क्षेत्राचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी एकजुटीने

आवाज उठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शेखर भोयर यांनी केले.
शिक्षकांची संख्या अधिक आणि त्यांच्या नेत्यांकडे वेळ अत्यल्प, अशी अवस्था आज आहे. भाऊसाहेबांच्या मार्गावर चालून शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्याचे ध्येय मी

उराशी बाळगले आहे. माझी संपूर्ण वेळ शिक्षकांसाठी उपलब्ध आहे. शिक्षकांसाठीची आपल्या सर्वांच्या मनातील व्यवस्था प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मला एकदा संधी द्या, असे

अग्रही प्रतिपादन भोयर यांनी केले.
काही उमेदवारांमार्फत जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. अशा भुलथापांना बळी न पडता शिक्षण क्षेत्राच्या अस्तित्वासाठी कार्यशील उमेदवारालाच संधी द्या, असे

आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद व विदर्भ जनसंग्राम शिक्षक संघटनेचे उमेदवार शेखर भोयर यांनी केले. मतदारसंघात सुरू असलेल्या शेखर भोयर

यांच्या झंझावाती प्रचारसभांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The fight for the rights of the teacher: Shekhar Bhoyar