लढ्ढा जिनिंग प्रेसिंगला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST2021-02-09T04:15:16+5:302021-02-09T04:15:16+5:30

लाखोंचा कापूस खाक, चार बंबांच्या साह्याने नियंत्रण अमरावती : कॉटन मार्केट परिसरातील लढ्ढा जिनिंग प्रेसिंगला भीषण आग लागल्याची घटना ...

Fierce fire to fight ginning pressing | लढ्ढा जिनिंग प्रेसिंगला भीषण आग

लढ्ढा जिनिंग प्रेसिंगला भीषण आग

लाखोंचा कापूस खाक, चार बंबांच्या साह्याने नियंत्रण

अमरावती : कॉटन मार्केट परिसरातील लढ्ढा जिनिंग प्रेसिंगला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता घडली. यात १२५ लाखांचा कापूस जळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

विलासनगर मार्गावरील कॉटन मार्केट परिसरातील अनूप गोपालदास राठी यांचे लढ्ढा जिनिंग प्रेसिंग आहे. तेथे दररोज तीन शिफ्टमध्ये रुई, सरकी गलाईचे काम सुरू होते. जिनिंगच्या आवारात सर्वत्र कापसाची गंजी लावलेली होती. अचानक आग लागल्याने संपूर्ण कापूस आगीच्या विळख्यात सापडला. या घटनेने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. फायरमन प्रवीण राठोड, विशाल भगत, सुशांत तायडे, सुनील काकडे, नितीन चौधरी, विक्की हिवराळे, प्रज्ज्वल मकवाने, वाहनचालक नरेंद्र कोकणे, संजय चव्हाण, शोएब खान यांनी चार बंबांच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविला.

Web Title: Fierce fire to fight ginning pressing