शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांनी घरीच तयार केले खत, पेरणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 23:54 IST

शेतकºयांची परिस्थिती बिकट असतानाही जगण्याची व नाविण्याची उमेद कायम असल्याचे ....

ठळक मुद्देआशेचा किरण कायम : शेत मजुरांच्या कमतरतेमुळे घडले इनोव्हेशन

नितीन टाले।लोकमत न्यूज नेटवर्ककावली वसाड : शेतकºयांची परिस्थिती बिकट असतानाही जगण्याची व नाविण्याची उमेद कायम असल्याचे उदाहरण नजीकच्या गव्हानिपाणी येथील युवा शेतकरी प्रशांत हटवार यांनी आपल्या कृतीतून दिले आहे. प्रशांत यांनी आपल्या घरीच साहित्याची जुळवाजुळव करून खत व पेरणी यंत्राची निर्मिती केली आहे.दिवसेंदिवस मजुराची संख्या कमी होत आहे. सोबतच मजुरीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढल्या जात आहे. त्यामुळे शेती ही परवडत नाही, अशी ओरड आहे. मजूर न मिळाल्यामुळे वेळेवर शेतीचे कामे होत नाही. वेळ आणि पैसा याची बचत व्हावी. म्हणून व शेतीचे कामही वेळेवर व्हावे, हा विचार मनात ठेवून आधुनिकतेची कास धरत पेरणी यंत्र तयार केल्याचे हटवार यांनी सांगितले. साधारण या पेरणी यंत्राला एक हजार रूपये खर्च आला आहे. घरचाच डवरा, एक टोपली, एक पोकळ पाईप आणि दोन नळ्या आणि टोपलं बसेल इतका पाईप त्यावर बसविल्या गेले. एक कॉक पण केला गेला कारण ते कमीजास्त खत देता यावे, यासाठी दोन्ही बाजूला खत पडेल अशी रचना केली आहे. साधारणत: एक दिवसाला चार ते पाच एकरातील पिकाला यामुळे खत देऊ शकतो, असे हटवार यांनी सांगितले. या विज्ञानवादी युगात शेतकरीही मागे नाही, हे गव्हानिपाणी येथील शेतकरी प्रशांत हटवार यांनी दाखवून दिले.