शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

राजकोटवाला स्वीट सेंटरवर एफडीएची धाड

By admin | Updated: October 11, 2016 00:11 IST

‘राजकोटवाला’ स्वीट सेंटरमध्ये अस्वच्छ जागेत व घाणीच्या ठिकाणी मिठाई व खाद्यपदार्थ तयार करीत असल्याचे प्रकरण...

दोन नमुने तपासणीला पाठविणार : अस्वच्छ जागेत मिठाई निर्मितीअमरावती : ‘राजकोटवाला’ स्वीट सेंटरमध्ये अस्वच्छ जागेत व घाणीच्या ठिकाणी मिठाई व खाद्यपदार्थ तयार करीत असल्याचे प्रकरण 'लोकमत'ने पुराव्यानिशी उघडकीस आणले होते. हे वृत्त प्रकाशित होताच एफडीएच्या अधिकाऱ्यांनी ‘राजकोटवाला’ स्वीट सेंटरवर धाड टाकून दुकानाची झाडाझडती घेतली. पाहणीअंती बुंदी व काजूकतलीचे दोन नमुने घेण्यात आले असून हे नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.जयस्तंभ चौकातील राठी कॉम्पलेक्समध्ये असलेल्या ‘राजकोटवाला’ मिठाई सेंटरमध्ये सोमवारी दुपारी २ वाजता अन्न सुरक्षा अधिकारी विश्वजित शिंदे व नीलेश ताथोड यांनी धाड टाकून ही कारवाई केली. रविवारी लोकमत प्रतिनिधीने राजकोेटवाला प्रतिष्ठानाच्या खाद्यपदार्थ तयार करण्यात येणाऱ्या जागेची पाहणी करून सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. यावेळी अत्यंत घाण जागेवर रसगुल्ला, बुंदी, मिठाई व पेढा तयार करण्यात येत होता. ज्याठिकाणी बुंदीचा ट्रे ठेवला होता तेथून काहीच अंतरावर प्लास्टिकचा कचरा जाळला जात होता. तो कचरा व त्याची राख उघड्यावरील बुंदीच्या ट्रेमध्ये उडत होती. इतकेच नव्हे तर उघड्यावरच ठेवण्यात आलेल्या रसगुल्ल्याच्या भांड्याभोवताल माशा भणाणत होत्या. हा किळसवाणा प्रकार लोकमतने कॅमेराबद्घ केला होता. संचालकांना बजावणार नोटीसअमरावती : त्यामुळे अन्न व सुरक्षा मानदे कायद्याची पायमल्ली केली जात असल्याचे स्पष्ट झाले. हे वृत्त प्रकाशित होताच एफडीएने कारवाईचा बडगा उगारला आहे. हॉटेल चालकाने अन्न सुरक्षा मानदे कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने एफडीएद्वारे राजकोटवाला मिठाई सेंटरच्या संचालकाला सुधारणा नोटीस बजावणार असल्याचे एफडीएचे अन्न सुरक्षा अधिकारी विश्वजीत शिंदे यांनी सांगितले. नमुने दोषी आढळल्यास संचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तासभर ही तपासणी केली. (प्रतिनिधी)राजकोटवाला मिठाई सेंटरची तपासणी करण्यात आली आहे. दोन नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून लवकरच संचालकाला नोटीस बजावण्यात येईल. नमुने दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. -विश्वजीत शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी.