शेतकऱ्यांना दिवसा देता येणार पिकाला पाणी; आठ तास वीज मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:50 IST2025-11-11T15:49:21+5:302025-11-11T15:50:46+5:30

महावितरणकडून दिलासा: उपकेंद्र येथे पॉवर रोहित्राच्या कामामुळे रात्रीचे ओलित होणार दिवसाच

Farmers will be able to water their crops during the day; they will get electricity for eight hours | शेतकऱ्यांना दिवसा देता येणार पिकाला पाणी; आठ तास वीज मिळणार

Farmers will be able to water their crops during the day; they will get electricity for eight hours

लोकमत न्यूज नेटवर्क
पथ्रोट :
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून तयार होत असलेल्या पथ्रोट येथील उपकेंद्रात १० एमव्हीए पॉवर रोहित्राच्या कामास सहायक अभियंता दिगंबर मौदेकर यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला आहे. या उपकेंद्राच्या बांधकामाला पण सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सलग ८ तास वीजपुरवठा उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. रात्रीचे ओलीत बंद होऊन हिंस्र प्राण्यांपासून होत असलेला धोका यामुळे टळणार आहे.

पथ्रोट येथील पावर हाऊसअंतर्गत परसापूर, भिलोना, शिंदी या उच्चदाब वाहिनीसाठी दिवसा वीजपुरवठा देणे सोयीचे ठरणार आहे. महावितरणचे सध्याच्या वेळापत्रक नियमानुसार सप्ताहातील काही दिवस दिवसा व रात्री असे भारनियमन असायचे. पण शेतशिवारात शेतकरी तथा शेतमजुरांना रात्रीला पाणी देण्यासाठी जावे लागे. अशावेळी डुक्कर, साप, विंचू, बिबट्या अशा हिंसक प्राण्यांपासून धोका निर्माण होत होता. शेतकऱ्यांवर हल्ला होऊन जखमी होण्याचे प्रमाण व घटना घडताना दिसून येत असायच्या. पण आता महावितरणने नवीन पॉवर रोहित्राचे काम सुरू केल्यामुळे रात्रीचा वीजपुरवठा बंद करणार व दिवसाला आठ तास वीजपुरवठा करून शेतकऱ्यांना सोयीचा जाईल अशी व्यवस्था महावितरण करणार आहे.

शेतकऱ्यांमध्ये समाधान

महावितरणच्या या सुविधेमुळे शेतात रात्रीचे ओलीत पूर्णतः बंद होणार व दिवसा वीजपुरवठा मिळून ओलीत करणे सोयीचे जाणार आहे. रात्रीला शेतात मिळणारा सिंगल फेज वीजपुरवठा कायमस्वरूपी सुरूच राहणार, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

"वीजेअभावी रात्रीला शेती पिकांना पाणी देण्याचे काम करण्यास मजूर नकार देतात. यातच वीजेअभावी रात्रीच्या ओलिताचे नियोजन बदलते. या निर्णयामुळे दिवसा शेती पिकांना पाणी देणे सोईचे होईल. व रात्रीची डोकेदुखी थांबेल."
- अशोक अरबट, शेतकरी
 

Web Title : किसानों को दिन में मिलेगा पानी: आठ घंटे बिजली

Web Summary : पथ्रोट के किसानों को नए बिजली उप-केंद्र से सिंचाई के लिए दिन में आठ घंटे बिजली मिलेगी। इससे रात में पानी देने की आवश्यकता और जंगली जानवरों से होने वाले खतरे खत्म हो जाएंगे, जिससे किसान समुदाय को राहत मिलेगी।

Web Title : Farmers to Get Daytime Water Supply: Eight Hours of Electricity

Web Summary : Farmers in Pathrot will receive eight hours of daytime electricity for irrigation due to a new power sub-center. This eliminates the need for nighttime watering and the dangers posed by wild animals, bringing relief to the farming community.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.