शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी कंपन्या तयार करणे गरजेचे !

By admin | Updated: September 7, 2016 00:21 IST

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांमध्ये संघटन नसल्याने आता शेतकऱ्यांनी कंपन्या तयार करून कृषिमालाची विक्री करण्याची वेळ आली आहे.

अमर हबीब : शेतकरी कायदेविषयक परिषदेतील सूर वरूड : शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांमध्ये संघटन नसल्याने आता शेतकऱ्यांनी कंपन्या तयार करून कृषिमालाची विक्री करण्याची वेळ आली आहे. सुविधा आणि फायदे जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी सुखी, समाधानी होणार नाही. जगाचा पोशिंदा जगला पाहिजे, शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कायदे करून सरकारने केलेले कायदे मोडीत काढले पाहिजे, असे प्रतिपादन किसानपुत्र समितीचे अध्यक्ष अमर हबीब यांनी स्थानिक काठीवाले सभागृहात आयोजित शेतकरी कायदेषियक परिषदेत केले. देशात अन्न पिकविणारा शेतकरी आहे. कारखानदाराला कर्ज दिल्यांनतर बुडीत असले तरी जप्ती केली जात नाही. मात्र शेतकऱ्यावर कर्ज असले तर मानहाणीचे प्रकार घडतात. यातूनच शेतकरी आत्महत्या करतो. कारखानदाराकरिता सिलिंग कायदा नाही. मात्र मातीतून अन्न पिकविणाऱ्या शेतकऱ्याकरिता सिलिंगचा कायदा करून शेती बळकावण्याचे प्रयत्न सरकार करते. राजकीय नेते अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टवर बोलतात. मात्र सिलिंंगच्या विरोधात का कधीच बोलत नाही. शेतकऱ्यांच्या मुळावरच घाव घालण्याचे काम सरकारच करीत असल्याचे आरोपसुध्दा करण्यात येऊन राजकारणात शेतकऱ्यांनी पाय रोवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही अमर हबीब यांनी पत्रपरिषदेत सांगितले. अध्यक्षस्थानी विचारवंत शेतकरी संघटनेचे नेते अमर हबीब, उदघाटक सहायक आयकर आयुक्त अभय देवरे, स्वागताध्यक्ष सत्यशोधक फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर आंडे, प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, शल्यचिकित्सक सुधाकर बंदे, शेतकरी नेते दिलीप भोयर, वासुदेव लांडगे, विकास हरडे, प्रमुख वक्ते जनमंचचे अध्यक्ष अनिल किल्लोर, शेतकरी आंदोलक गजानन अमदाबादकर, चंद्रकांत वानखडे, शरद पाटील, अच्युत गंगाणे, समाजप्रबोधनचे अध्यक्ष प्रवीण चौधरी, जायन्टस ग्रुपचे अध्यक्ष नितीन खेरडे आदी उपस्थित होते. शेतकरी विरोधी कायद्यामुळे शेतीमध्ये बंदिस्थता आली आहे. शेतकरी गुलाम होत आहे. जगाचा अन्नदाता पोशिंदा उपाशी असताना दुष्काळासोबत सामना करीत आहे, तरी सरकारचे याकडे दुर्लक्ष असल्याचे विचारवंतांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. अनिल किल्लोर यांनी शेतकऱ्यांना गळफास ठरलेले कायदे व घटना दुरस्त्या, शेतकरी आंदोलक गजानन अमदाबादकर यांनी शेती व शेतकऱ्यांच्या समस्या व समाधान, तर चंद्रकांत वानखडे यांनी शेतकरी आत्महत्येचे वास्तव, शरद पाटील यांनी शेतकऱ्यांनाा सवलती किती खऱ्या आणि किती खोट्या? या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्यांकरिता हिताचे रक्षण करणारे कायदे करणे गरजेचे असल्याचा सूर व्यासपीठावरून उमटत होता. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वॉटर कप स्पर्धेमध्ये पारितोषिक पात्र गावाच्या सरपंच, उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन नितीन ठाकरे यांनी, तर आभार पुरुषोत्तम कळमकर यांनी केले. शेतकरी कायदेविषयक परिषदेकरिता सत्यशोधक फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)