कोरोना व्हायरसच्या संकटात सापडला शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 05:00 AM2020-04-19T05:00:00+5:302020-04-19T05:00:02+5:30

मोर्शी तालुक्यातील सर्व शेतकरी गहू, हरभरा आदी शेतमाल काढण्याच्या कामात व्यस्त होते. काही शेतकºयांनी संवगणी करून ठेवलेली होती, तर काही कापण्यासाठी तयार होता. दुसरीकडे बाजार समित्यांवरही लॉकडाऊनचा परिणाम दिसत असल्याने बाजार समितीमधील व्यवहार बंद केल्या गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करता येत नव्हती. परिणामी त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले.

Farmers found in trouble with corona virus | कोरोना व्हायरसच्या संकटात सापडला शेतकरी

कोरोना व्हायरसच्या संकटात सापडला शेतकरी

Next
ठळक मुद्देआर्थिक व्यवहार ठप्प, खासगी बाजारात भाव पडले, खरेदीदार गावाकडे फिरकेना

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : शेतकऱ्यांना कधी आस्मानी, तर कधी सुल्तानी संकटांना तोंड द्यावे लागते. त्याचे अवघे आयुष्य संघर्ष करण्यातच जात आहे. यंदा पिकांची अवस्था चांगली असताना व बाजार समित्यांमध्ये माल विक्री जोरात सुरू असताना कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली.
मोर्शी तालुक्यातील सर्व शेतकरी गहू, हरभरा आदी शेतमाल काढण्याच्या कामात व्यस्त होते. काही शेतकऱ्यांनी संवगणी करून ठेवलेली होती, तर काही कापण्यासाठी तयार होता. दुसरीकडे बाजार समित्यांवरही लॉकडाऊनचा परिणाम दिसत असल्याने बाजार समितीमधील व्यवहार बंद केल्या गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करता येत नव्हती. परिणामी त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. दुसरीकडे सरकारने शेतीसंबंधित व्यवसाय व व्यवहार सुरू ठेवण्यास परवाणगी दिली आहे. नोंदणीशिवाय शेतमालाची विक्री करणे शक्य नाही.
मोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाची आवक थोडी वाढली असून, शनिवार, १८ एप्रिल रोजी तालुक्यातील निकड असलेल्या शेतकऱ्यांनी मालाची विक्री होईल व आपल्या हातात पैसा येईल, या आशेने शेतमाल यार्डात आणून टाकला. शनिवारी बाजार समितीत हरभरा ४५६ क्विंटल आला असून, त्याला भाव ३७०० ते ४९३५ रुपये तूर, ८७५ क्विंटल पाच हजार ते ५३५० रुपये भाव. सोयाबीन २५ क्विंटल दर ३५०० ते ३६२५ गहू ११२ क्विंटल भाव १५०० ते १७५० प्रतिक्विंटल भाव मिळाल्याचे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सांगितले. मात्र, कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये झालेली गर्दी अनेकांसाठी धोक्याची ठरण्याचीही शक्यता आहे. यावर बाजार समितीने पुढाकार घ्यावा, असे शेतकरी बोलत होते. अनेक शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्या कुटुंबाची आणि शेतात राबणाºया मजुरांच्या उदरनिर्वाहाची चिंता सतावत असल्याचे मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

शेतमालाला योग्य भाव हवे
बाजार समित्या धोका पत्करण्यास तयार नाहीत अशी अवस्था दिसून येत आहे. शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव देणे आवश्यक आहे. हा काळ अडचणीचा आहे, सरकारवर आरोग्य व्यवस्थेपासून ते नागरिकांच्या जीवाची व कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी आहे. देशातील कृषी साखळी ही मजबूत असून बाजार समित्या त्यात मोठा दुवा आहे, या काळात शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

Web Title: Farmers found in trouble with corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.