शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेचा रस्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 22:27 IST

भारतीय कम्युनिस्ट पार्टी व किसान सभेच्या वतीने बुधवारी नागपूर-मुंबई महामार्गावरील रहाटगाव चौफुलीवर आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देआंदोलन : शेतकºयांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतीय कम्युनिस्ट पार्टी व किसान सभेच्या वतीने बुधवारी नागपूर-मुंबई महामार्गावरील रहाटगाव चौफुलीवर आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाने शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली.शेतकºयांच्या संपाचा धसका घेऊन शासनाने कर्जमाफी जाहीर केली. मात्र त्यात अटी व शर्ती समावेश करून शासनाने शेतकºयांचा विश्वासघात केला. याच्या निषेर्धात शेतकºयांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणाला विरोध करीत समृद्धी महामार्गासाठी एक इंच देखील जमीन देणार नसल्याची शपथ घेतली आहे. समृद्धी महामार्गाला शेतकºयाचा विरोध असताना शासन भूसंपादन कायद्याची अंलबजावणी न करता कमी किमंतीत शेतकºयाचा जमिनी कंत्राटदारांना विकत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शासनाने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, शेतकºयांना जून २०१७ पर्यंतची सरसकट कर्ज माफी द्यावी, शेतीकरिता अत्यल्प व्याजदरात कर्ज पुरवठा करावा, आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.शासनाच्या जनविरोधी धोरण राबवून शेतकरी व शेतमजूर, कामगारांना देशोधडीला लावण्याचा सपाटा शासनाने चालविल्याचा विरोधात किसान सभा व कम्युनिस्ट पार्टीने रस्ता रोकोच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. यामुळे राष्ट्रीय महार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. या मार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनात कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे, किसान सभेचे अशोक सोनारकर, नामदेव बदरके, भाकपचे जिल्हा सचिव सुनील मेटकर, जे.एम कोठारी, उमेश बनसोड, सुनील घटाळे, शिवाजी देशमुख, नारायण भगवे, बी.के.जाधव, पंडीत ढोके, चंद्रकात वडस्कर, विनोद जोशी, गणेश अवझाडे, एम वाय शहाणे, मेघा चौधरी, चंद्रकात बानुबाकोडे, उषा घटाळे यांच्या शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.