शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मिळाला हक्काचा निवारा !

By admin | Updated: August 8, 2015 00:26 IST

तीन महिन्यांपूर्वी नापिकीला कंटाळून खानापूर येथील शेतकरी शिवहरी ढोक या शेतकऱ्याने बँकेच्या तगाद्याला कंटाळून शेतातच जीवनयात्रा संपविली.

दिलासा : राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत क्रांतिदिनी गृहप्रवेशवरुड : तीन महिन्यांपूर्वी नापिकीला कंटाळून खानापूर येथील शेतकरी शिवहरी ढोक या शेतकऱ्याने बँकेच्या तगाद्याला कंटाळून शेतातच जीवनयात्रा संपविली. परंतु कुटुंबातील कर्ता माणूस निघून गेलल्यावर तीन मुलीसह पत्नीचा संसार उघड्यावर आला होता. दोन वेळची पोटची खळगी भरण्यासाठी अन्न व डोक्यावर साधे छप्पर ही नव्हते. पतीच्या निधनानंजर ढोक परिवार बेघर झाला होता. आत्महत्याग्रस्त कुटुंबाची दखल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा.राजू शेट्टी यांनी घेऊन रमाबाईला हक्काचे घर उभारुन दिले. तसेच मुलींचा शिक्षणाचा भार उचलला. यामुळे क्रांतीदिनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेद्वारे ढोक परिवाराला घर हस्तांतरित करणार आहे.खानापूर येथील शिवहरी ढोक या शेतकऱ्याकडे पावणेतीन एकर कोरडवाहू जमीन होती. कपाशी, तूर पेरली. मात्र निसर्गाच्या अवकृपेने संपुर्ण पीक बुडाले. डोक्यावर कर्जाचा बोझा वाढला. परिवारातील तीन मुलींचे शिक्षण कसे करावे? कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, हा प्रश्न निर्माण झाला. यातच घरबांधणीकरिता एका कंपनीचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीकरिता सततचा तगादा सुरु झाल्याने ते निराशेच्या गर्तेत आले होते. अखेर शेतात विष प्राशन करून ५ एप्रिलला त्यांनी जीवनयात्रा संपविली. परंतु कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने डिंपल, श्वेता संवदा या तीन मुलीसह पत्नी रमाबाई व्यथित झाली होती. ग्रामस्थांनी मदत करुन दुसऱ्याच ेघरात आश्रय दिला. शेतकरी आत्महत्या ग्रस्त ढोक परिवारावर दु:खाचे सावट होते. सरकारने काही प्रमाणात धान्य देऊन बोळवण केल्यागत प्रकार घडला होता. लोकप्रतिनीधींनी अल्पशी मदत केली होती. परंतु निवारा नसल्याने या परिराची कुचंबणा होती. एक महिण्यापूर्वी खा.राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि रविकांत तुपकर वरुडला आले असता ढोक परिवाराची व्यथा ऐकून नि:शब्द झाले होते. थेट खानापूर गाठून ढोक परिवाराची डोळे पाणावणारी दु:खद कहाणी ऐकली तेव्हा तिन्ही तरुण मुलींनी केवळ आम्हाला स्नानगृह आणि शौचालय बांधून द्या अशी विनवणी केली. तेव्हा खा. शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या वर्गणी आणि श्रमदानातून सर्वसोयीचा निवारा उभारुन रमाबाई आणि तीन मुलींना कायमचा निवारा बांधून दिले. (तालुका प्रतिनिधी)