शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
4
बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
5
ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर
6
Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
7
IPL 2026: विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी
8
दिलजीत दोसांझ भारतीय नाही? ४ वर्षांआधीच स्वीकारलं अमेरिकेचं नागरिकत्व; का होतेय चर्चा?
9
NEET पेपर लीकचा 'मास्टरमाइंड' शुभम नाही तर कोण? राजस्थान ते नाशिक धागेदोरे; २ ते ५ लाखांत फुटला पेपर!
10
Katie Archibald: रुग्णांची सेवा करण्यासाठी स्पोर्ट्स करिअरवर सोडलं पाणी; स्टार खेळाडूची जगभरात चर्चा!
11
कोकणात जाण्यासाठी १२ तास ‘यातनांचा प्रवास’, त्याआधी १० तास प्लॅटफॉर्मवर मुक्काम
12
Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!
13
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
14
पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती
15
ह्रदयद्रावक! नातीचा मृतदेह मांडीवर ठेवून आजोबांनी काढली रात्र; चाळीसगावमधील संतापजनक घटना
16
Adhik Maas 2026: अधिक मासात संकटमुक्तीसाठी करा 'ही' दत्तसेवा; मिळेल श्री दत्तगुरूंचा अखंड आशीर्वाद!
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातविरुद्ध दोषारोपपत्र; ४९ दिवसांपासून कोठडीत; १०५ साक्षीदारांकडे चौकशी
18
Sambit Patra : "२२ वर्षांत ५४ परदेश दौरे, राहुल गांधींच्या ट्रिपचा खर्च ६० कोटी"; कमाईवरुन भाजपाचा सवाल
19
Harish Rana : मृत्यूनंतरही हरीश राणा ठरले 'हिरो'; कुटुंबाच्या एका निर्णयाने कोर्टाचेही डोळे पाणावले!
20
Dollar vs Rupee : रुपया २० पैशांनी घसरुन विक्रमी नीचांकी स्तरावर; डॉलरच्या तुलनेत ९६ च्या जवळ पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलांसाठी गौण खनिज उत्खनन

By admin | Updated: June 11, 2014 23:01 IST

तालुक्यात जवळपास एक हजार घरकुलांचे काम युध्दस्तरावर सुरू आहे. या कामासाठी लागणाऱ्या गौणखनिजांचा काही ट्रॅक्टर मालक स्वयंघोषित कंत्राटदार बनून पुरवठा करीत आहेत. डब्बर व रेतीसह विटांचाही

धारणी : तालुक्यात जवळपास एक हजार घरकुलांचे काम युध्दस्तरावर सुरू आहे. या कामासाठी लागणाऱ्या गौणखनिजांचा काही ट्रॅक्टर मालक स्वयंघोषित कंत्राटदार बनून पुरवठा करीत आहेत. डब्बर व रेतीसह विटांचाही यात समावेश आहे. या तीनही

सामग्रीच्या वाहतुकीसाठी रॉयल्टीची गरज असते. मात्र पुरवठादार हे राजकीय पक्षांचे पुढारी असल्याने त्यांनी जवळपासच्या नदी नाल्यांना लक्ष्य बनवून अवैधरित्या रेतीचा उपसा चालविला आहे. परिणामी नदी-नाल्यांना धोेका निर्माण झाला आहे.
अवैधरित्या रेतीचा उपसा करण्यात येत असल्याने नदी-नाल्यांत खोलवर खोदकाम करण्यात आले आहे. नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र येथील अवैध कामकाजावरून दिसून येत आहे. या प्रकाराला गावपातळीवरील कोतवाल व तलाठ्यांचे

अभय लाभत असल्याने तस्करांचे चांगलेच फावले आहे. त्याचप्रमाणे नदी-नाल्यांच्या पात्रातून दगड फोडून त्याचे डब्बरमध्ये रूपांतरण करून विना परवाना वाहतूक केली जात आहेत. घरकूल लाभार्थ्यांपर्यंत हा माल पोहोचविण्यात येत आहे. वास्तविक

तालुक्यात एकच रेती पुरवठादार असून डब्बरचाही एकच अधिकृत परवानाधारक पुरवठादार आहे. या परवानाधारकांकडून आतापर्यंत रेती व डब्बरचे रॉयल्टी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकृतरीत्या तालुक्यातील तापी नदी-पत्रातील केवळ सोनाबर्डी व मोथा या दोनच रेतीघाटांचे लिलाव झाले आहेत. तरीदेखील लिलाव न झालेल्या गडगा, सिपना, खंडू व खापरा नदीसह इतर लहान-मोठ्या नदी-नाल्यांच्या पात्रातून दररोज शेकडो ब्रास रेतीचा

अवैध उपसा केला जात आहे. तसेच डब्बर व मुरमासाठी एकच परवानाधारक आहे. त्यांचे क्रशर व खदान हे शरहाला लागूनच असलेल्या नाक्याजवळ आहे. त्यांच्याकडूनही घरकुल लाभार्थ्यांनी डब्बर खरेदी केले नसल्याची माहिती आहे. तरीही प्रत्येक

घरकूल लाभार्थ्याकडे तीन ते चार ब्रास डब्बर कोठून आले, हा संशोधनाचा विषय आहे.
तालुक्यातील नदी-नाले सद्यस्थितीत तस्करांसाठी सोन्याच्या खाणी बनल्या आहेत. या माध्यमातून हे तस्कर मालामाल होत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात गौण खनिजांचा अवैध उपसा होत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याकडे महसूल विभागाने त्वरित

लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)