शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा २० ऑक्टोबरपासूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 05:00 IST

कुलगुरूंच्या दालनात सलग दोन दिवस बैठकांचे सत्र सुरूच होते. प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांंच्याकडून परीक्षांबाबतची तयारी कुलगुरूंनी जाणून घेतली. ऑनलाईन परीक्षेत येणाऱ्या तांत्रिक अडचणींसंदर्भात ह्यडेमोह्णदेखील झाला आहे. परीक्षेसाठी नियुक्त नागपूर येथील एजन्सीकडून तांत्रिक अडचणींवर तोडगा काढण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देपरीक्षा मंडळाचे शिक्कामोर्तब : ऑफलाईन, ऑनलाईन परीक्षांचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्ष व इतर सत्राच्या परीक्षा २० ऑक्टोबरपासून घेण्यात येईल, असा निर्णय परीक्षा मंडळाने बुधवारी घेतला आहे. मानव्यविद्या, वाणिज्यविद्या, सायन्स व अभियांत्रिकी आणि आंतरविद्या अशा चारही विद्याशाखांच्या परीक्षा यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार होणार आहे. केवळ १२ ते १९ ऑक्टोबर दरम्यानचे पेपर स्थगित करण्यात आले आहेत.१२ ऑक्टोबरपासून ऑफलाईन, ऑनलाईन अशा दोनही पद्धतीच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, परीक्षेच्या आदल्या दिवशी तांत्रिक कारणे उद्भवल्याचे दिसून येताच या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षांचे व्यवस्थित नियोजनासाठी गत दोन दिवसांपासून कुलगुरू मुुरलीधर चांदेकर यांनी सूत्रे हाती घेतल्याचे दिसून आले.कुलगुरूंच्या दालनात सलग दोन दिवस बैठकांचे सत्र सुरूच होते. प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांंच्याकडून परीक्षांबाबतची तयारी कुलगुरूंनी जाणून घेतली. ऑनलाईन परीक्षेत येणाऱ्या तांत्रिक अडचणींसंदर्भात ह्यडेमोह्णदेखील झाला आहे.परीक्षेसाठी नियुक्त नागपूर येथील एजन्सीकडून तांत्रिक अडचणींवर तोडगा काढण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.परीक्षा सुरळीतवर भरविद्यापीठ परीक्षा मंडळाची बुधवारी ऑनलाईन बैठक पार पडली. परीक्षा मंडळाचे अध्यक्ष कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा ह्यसुरळीतह्ण होण्यासाठी प्राधान्याने भर दिला. एजन्सीला तांत्रक अडचणींवर मात करण्यासाठी काही सूचनादेखील देण्यात आल्यात. २० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर यादरम्यान परीक्षांचे नियोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरु राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, परीक्षा मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश मोहरील, मनीषा काळे, बी.डब्ल्यू. निचित यांच्यासह प्राचार्य, शिक्षकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.५५० पेपरच्या तारखांमध्ये होणार बदलविद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने ऑनलाईन बैठकीत १२ ते १९ ऑक्टोबर दरम्यान असलेले पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. २० ऑक्टोबर ते पुढे असलेले पेपर जैसे थे घेण्यात येतील, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. १२ ते १९ ऑक्टोबर दरम्यान सुमारे ५५० पेपर पुढे घेण्यात येतील, अशी माहिती आहे. त्यानुसार अंतिम वर्ष व अन्य परीक्षांचे वेळापत्रक तयार करण्यात येत आहे.१७ ऑक्टोबरपासून मॉक ड्रीलविद्यापीठाच्या चारही विद्याशाखांच्या परीक्षा २० ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्या अनुषंगाने ऑनलाईन परीक्षेच्या तयारीविषयी विद्यार्थ्यांना १७ ऑक्टोबरपासून ह्यमॉक ड्रीलह्ण होणार आहे. मोबाईल, डेस्कटॉप, लॅपटॉपवर ऑनलाईन परीक्षा देता येणार आहे. १७ ते १९ ऑक्टोबर असे तीन दिवस ह्यमॉक ड्रीलह्ण चालणार असल्याची माहिती कुलगुरू चांदेकर यांनी दिली.२० ऑक्टोबरपासून परीक्षा सुरु होतील. परीक्षा मंडळाच्या बैठकीत बुधवारी निर्णय झाला. दोन दिवसात सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. परीक्षेत अडचणी येणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :examपरीक्षाuniversityविद्यापीठ