शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेतल्यानंतरही 18 जणांची खुर्ची सुटेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 05:00 IST

एसीबी ट्रॅप झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. त्यात अटक झाल्याचा कालावधी ४८ तासांहून अधिक असल्यास अटकेच्या दिनांकापासून मानीव निलंबनाचे आदेश काढणे अनिवार्य आहे. मानीव निलंबनाची प्रकरणे वगळून लाचेच्या सापळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अपचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सक्षम प्राधिकाऱ्यांनी करावी. प्रकरणाचे गांभीर्य व पुराव्यांची सद्यस्थिती पाहून तत्काळ निलंबनाबाबत निर्णय घेण्यात यावा.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसीबी ट्रॅपप्रकरणी अटक झालेली नाही, या केवळ एका कारणास्तव सरसकट सर्व प्रकरणात निलंबन नाकारण्यात येऊ नये. प्रत्येक प्रकरणात स्वतंत्रपणे निर्णय घेऊन तो शासनाच्या नगरविकास विभाग व गृह विभागास माहितीस्तव कळविण्यात यावा,  अशी दक्षता घ्यावी, असे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत झालेल्या कारवाईनंतर सक्षम प्राधिकरणाने अनुसरायच्या कार्यपद्धतीबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, एसीबीच्या संकेतस्थळानुसार, अमरावती परिक्षेत्रातील १८ जण निलंबनापासून अद्याप दूर आहेत. एसीबी ट्रॅप झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. त्यात अटक झाल्याचा कालावधी ४८ तासांहून अधिक असल्यास अटकेच्या दिनांकापासून मानीव निलंबनाचे आदेश काढणे अनिवार्य आहे. मानीव निलंबनाची प्रकरणे वगळून लाचेच्या सापळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अपचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सक्षम प्राधिकाऱ्यांनी करावी. प्रकरणाचे गांभीर्य व पुराव्यांची सद्यस्थिती पाहून तत्काळ निलंबनाबाबत निर्णय घेण्यात यावा. केवळ अटक झालेली नाही, या कारणास्तव सरसकट सर्व प्रकरणी निलंबन नाकारण्यात येऊ नये, अशा सूचना १६ मार्च रोजी देण्यात आल्या आहेत. 

१८ जणांचे निलंबन कुठे लटकले?

एसीबीच्या संकेतस्थळावरील सांख्यिकीनुसार, एसीबी ट्रॅपनंतरही अमरावती परिक्षेत्रातील १८ जणांचे निलंबन अद्याप झालेले नाही. त्यात काहींना अटक करण्यात आलेली नाही, तर काही जण ४८ तासांपेक्षा कमी कालावधीसाठी पोलीस कोठडीत होते, अशी कारणे समोर करण्यात आली आहेत. कुठे राजकीय दबावतंत्राचादेखील अवलंब केला गेला. 

काय आहे नवा आदेश? -    एसीबी ट्रॅपनंतर गुन्हा दाखल केला जातो. अटकेचा कालावधी ४८ तासांहून अधिक असल्यास मानीव निलंबनाचे आदेश काढावे लागतात. -    मानीव निलंबनाची प्रकरणे वगळून लाचेच्या सापळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई सक्षम प्राधिकाऱ्यांनी करावी, असे आहे.

महसूल अव्वलयंदा १ जानेवारी ते २२ मार्च या कालावधीत देखील महसूल, भूमिअभिलेख लाचखोरीत अव्वल आहे. संपूर्ण राज्यातील आठ परिक्षेत्रात लाचखोरीत पोलीस दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर महावितरण तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण