शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात पेंडालमध्ये मूल्यांकन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 06:00 IST

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा संपल्याच्या दिवसापासून ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे नियमावली आहे. मात्र, विद्यापीठात गत काही वर्षांपासून निकाल वेळेत जाहीर केले जात नाही. त्यामुळे परीक्षा व निकालात त्रुट्या, अनुपस्थिती असलेल्या परीक्षकांना पाच हजार रुपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद, अशी कारवाई प्रस्तावित आहे.

ठळक मुद्दे८१० परीक्षक : बॅकलॉग निकाल जाहीर, परीक्षा विभागात प्रचंड गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या केंद्रीय मूल्यांकन विभागात पेंडालमध्ये परीक्षकांकडून मूल्यांकनाची कामे सुरू झाली आहे. शुक्रवारी ८१० परीक्षाकांनी उपस्थिती दर्शविल्याने पेंडालदेखील मूल्यांकनास कमी पडला, हे विशेष.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा संपल्याच्या दिवसापासून ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे नियमावली आहे. मात्र, विद्यापीठात गत काही वर्षांपासून निकाल वेळेत जाहीर केले जात नाही. त्यामुळे परीक्षा व निकालात त्रुट्या, अनुपस्थिती असलेल्या परीक्षकांना पाच हजार रुपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद, अशी कारवाई प्रस्तावित आहे. त्यामुळे हिवाळी २०१९ परीक्षेदरम्यान केंद्रावर केंद्राधिकारी, सहकेंद्राधिकाऱ्यांसह परीक्षकांनी मूल्यांकनास उपस्थिती दर्शविली. परीक्षा विभागात प्राध्यापकांची जणू यात्रा भरली, असे चित्र आहे. विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यांतून गर्दी झाल्याने परीक्षा विभागात मूल्यांकनास जागा अपुरी पडली. त्यामुळे परीक्षा विभागाने तात्काळ छतावर पेंडाल टाकला. गुरूवारपासून परीक्षकांनी पेंडालमध्ये मूल्यांकन सुरू केले आहे. शुक्रवारी पेंडालमध्येसुद्धा परीक्षकांना जागा अपुरी पडली. परिणामी परीक्षा विभागात मिळेल त्या ठिकाणी टेबल टाकून परीक्षकांना मूल्यांकन करावे लागले. येत्या काही दिवसांनंतर परीक्षकांची अधिक गर्दी वाढणार आहे. १५ जानेवारीपर्यंत परीक्षा सुरु असणार असल्याची माहिती आहे. एकीकडे परीक्षा आणि निकाल अशा दोनही बाबी एकाचवेळी सुरू आहे. त्यामुळे हिवाळी परीक्षेचे निकाल ४५ दिवसांच्या आत जाहीर होतील, असे संकेत आहे.जागा अपुरी पडत असल्यामुळे मूल्यांकनाची व्यवस्था म्हणून छतावर पेंडॉल टाकण्यात आला आहे. येथे परीक्षकांना मूल्यांकनासाठी टेबल देण्यात आले आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून परीक्षेचे ‘एन्ड टू एन्ड’ आॅनलाईन कामे एजन्सीला दिली जाणार आहे.- हेमंत देशमुखसंचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :universityविद्यापीठ