शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोचालकांसाठी विकास कल्याण महामंडळ स्थापन करा

By admin | Updated: June 9, 2016 00:25 IST

राज्यातील अ‍ॅटोचालकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी एक वेगळे महामंडळ स्थापन करण्याची मागणी ....

मागणी : सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासनअंजनगाव सुर्जी : राज्यातील अ‍ॅटोचालकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी एक वेगळे महामंडळ स्थापन करण्याची मागणी महाराष्ट्र अ‍ॅटोरिक्षा चालक-मालक संघटनेने केली आहे. राज्याचे वित्त-नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत आॅटोचालक संघटनेच्या शिष्टमंडळासह बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्यशासन याबाबत जागरुकतेने विचार करीत आहे. असे स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याबाबत चारवेळा मंत्री पातळीवर बैठकी झाल्यात. राज्यात लवकरच अ‍ॅटोचालकांच्या हितासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना केली जाईल असे आश्वासन ना. मुनगंटीवार यांनी दिले.राज्यात ग्रामीण भागात जीथे एस.टी.ची. सेवा मर्यादितरीत्या मिळते. आणि जिथे कोणतेच सरकारी अथवा खाजगी वाहन प्रवासी वाहतूक करीत नाही, तिथे अविरतपणे अ‍ॅटोचालक आपल्या मेहनतीने प्रवाशांची ने-आण करतात. त्यांचेवर ग्रामीण भागात दळवळण व्यवस्था मोठया प्रमाणावर अवलंबून आहे. परंतु असंघटीत असल्यामुळे अ‍ॅटो चालकांचे कुटुंब या क्षेत्रातील सोई सवलतीपासून वंचित राहात आहे. या सोबतच प्रामुख्याने वित्तपुरवठा समस्या मोठया प्रमाणावर आहे. वेळेवर कर्ज पुरवठा करणारी आणि आर्थिक समस्या सोडविणारी कोणतीही यंत्रणा अ‍ॅटोचालकांसाठी राज्यात उपलब्ध नाही. यामुळे खाजगी पतपुरवठा त्यामुळे खाजगी प्रत पुरवठादारांच्या तावडीत त्यांचे मोठया प्रमाणावर शोषण होत आहे. (तालुका प्रतिनिधी)आॅटोचालकांची ग्रामीण भागात सेवाअंजनगाव दर्यापूर मार्गावरील कोकर्डा फाट्यापर्यंत, अकोट मार्गावर निमखेड बाजार, चिंचोणा आणि काली फाट्यावरुन काढगव्हाण पर्यंत तालुक्याचे ठिकाणापासून वीस किमी. पेक्षाही जास्त अंतरापर्यत आॅटोचालक युवक अविरतपणे ग्रामीण भागाता सेवा देतात. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात त्यांना कधी कधी ग्राहक मिळत नाहीत. दिवसभर थांबूनही प्रवाशी मिळत नाही. यामुळे त्यांचे नुकसान होते.परवाना नुतनीकरणाची मोहीम राबवापरवाना नुतनीकरणाची प्रक्रिया पुर्णपणे थांबलेली आहे. त्यामुळे या व्यवसायात नव्याने उतरु इच्छिणाऱ्या युवकांजवळ बॅचनंबरचा शिक्का उपलब्ध नाही. वाहतूक पोलिसांच्या तावडीत त्यांचा रोजगार हिरावला जातो. परवाना नुतनीकरण मोहीम शासन कधी करते हा प्रश्नच आहे.