शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या तिसर्‍याच दिवशी नववधूचे पलायन

By admin | Updated: May 15, 2014 23:05 IST

चांदूररेल्वे/तळेगाव : लग्नाच्या तिसर्‍या दिवशीच नवर्‍या मुलाची व नातेवाईकांची नजर चुकवून नववधूने प्रियकरासोबत पलायन केल्याची घटना तालुक्यातील सातेफळ येथे बुधवारी दुपारी घडली.

चांदूररेल्वे/तळेगाव : लग्नाच्या तिसर्‍या दिवशीच नवर्‍या मुलाची व नातेवाईकांची नजर चुकवून नववधूने प्रियकरासोबत पलायन केल्याची घटना तालुक्यातील सातेफळ येथे बुधवारी दुपारी घडली. प्रियकरासह नववधूला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे.

सातेफळ येथील तरुणीचा विवाह दारव्हा येथील नीलेश महादेव शेलोकार या युवकासोबत ठरला होता. १२ मे रोजी सातेफळ येथे वधूमंडपी धुमधडाक्यात विवाह सोहळा पार पडला. सायंकाळी नवरी मुलीचा ‘बिदाई’चा कार्यक्रम पार पडला. मुलीला सासरी पाठविताना तिच्या आई-वडील आणि इतरांचेही मन भरुन आले. त्यानंतर ही नववधू वरासह दारव्हा येथे पोहोचली. त्या ठिकाणीही नववधूचे पारंपरिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. मुलाकडील सत्यनाराणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नीलेश दुसर्‍या दिवशी या नवधूला घेऊन तिच्या माहेरी म्हणजे सातेफळ गावात घेऊन आला. १४ मे रोजी मुलीकडेही सत्यनाराणाच्या पूजेचा कार्यक्रम पार पडला. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. घरासमोर जेवणावळ सुरु होती. ज्येष्ठ मंडळी एकमेकांच्या भेटी-गाठी आणि चर्चेत मग्न होते. महिला मंडळीही एकमेकींच्या ख्यालखुशालीत मग्न होत्या. दरम्यान नववधू व तिच्या प्रियकरामध्ये कधी संवाद साधल्या गेला आणि कधी पळून जाण्याची योजना आखली याची पुसटशी कल्पनाही घरच्या मंडळींना नव्हती. १४ मे रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास नववधू व तिच्या प्रियकरामध्ये तयार केलेल्या योजनेप्रमाणे प्रियकराने तिच्या घराच्या मागील बाजुला चार चाकी वाहन आणून उभे केले. नववधूने वेळीच संधी साधून घरातून मागच्या दाराने पळ काढून प्रियकराच्या वाहनाने पोबारा केला. काही वेळानंतर नवरी मुलगी दिसत नसल्याचे पाहून शेजार्‍यांकडे तिचा शोध घेणे सुरु झाले. तिच्या मैत्रींकडेही शोधाशोध सुरु झाली. या प्रकरणाची कुजबूज लग्नमंडपातील पाहुणे मंडळींपर्यंत पोहोचली. काही वेळानंतरच सत्य उघड झाले आणि दोन दिवसांपूर्वी बोहल्यावर चढलेली वधू प्रियकरासोबत पळाल्याचे निश्‍चित झाली. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच वर नीलेशने थेट तळेगाव दशासर पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत मांडली. तत्पूर्वी मुलीच्या वडिलांनीही आपली मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. पोलिसांनी याघटनेची माहिती ‘वारलेस’हून सर्व पोलीस ठाण्याला देण्यात आली. बुधवारीच रात्री नववधू व तिचा प्रियकर ज्ञानेश्‍वर किसन ढोणे (२६, जळका जगताप) हे दोघे औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ही माहिती तळेगाव पोलिसांना मिळाली. पोलीस पथक औरंगाबादकरिता रवाना झाले. वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरु होती.