शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

‘डीटीई’च्या नोटिफिकेशनमध्ये त्रुटी!

By admin | Updated: June 1, 2016 00:42 IST

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०१६-१७ संदर्भात तंत्र शिक्षण संचालनालयाने नुकतेच नोटिफिकेशन जाहीर केले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : पाच टक्के गुणांची तफावत अमरावती : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०१६-१७ संदर्भात तंत्र शिक्षण संचालनालयाने नुकतेच नोटिफिकेशन जाहीर केले आहे. परंतु या नोटिफिकेशनमध्ये बऱ्याच त्रुटी असल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला आहे. या त्रुटीपूर्ण नोटिफिकेशनमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने मागील वर्षी महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम २०१५ पारित केला. त्यातील तरतुदीनुसार आता प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्या अनुषंगाने डीटीईने इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड टेक्नालॉजी (लेटरल टू एन्ट्री टू सेकंड इअर), फॉर्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅन्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी व डिप्लोमा इंजिनीयरिंग अ‍ॅन्ड टेक्नालॉजी या सहा प्रोग्रामाबद्दल नोटिफिकेशन दिले आहे. यात अभ्यसक्रमाचा कालावधी, पात्रता निकष जाहीर करण्यात येत आहेत. यात अनेक त्रुटी असल्याचा आरोप होत आहे. तंत्रशिक्षण क्षेत्रातील एआईसीटीई ही सर्वोच्च संस्था आहे. डीटीई ही राज्यस्तरावर काम करते. मात्र, इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या चार वर्षीय अभ्यासक्रमात प्रवेशाची पात्रता एआयसीटीईने ४५ टक्के गुण अशी ठरविली असताना डीटीईने मात्र हीच पात्रता ५० टक्के गुणांवर पोहोचविली आहे. भौतिकशास्त्र आणि गणित विषय घेऊन १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याने रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवशास्त्र आणि टेक्निकल व्होकेशनल यापैकी एका विषयात ४५टक्के गुण ‘एआय सीटीई’ने अनिवार्य केले आहेत. डीटीईने यापैकी कुठल्याही एका विषयात ५० टक्के गुण अनिवार्य हा निकष ठरविला आहे. एआयसीटीई आणि डीटीई या उभय संस्थांनी प्रवेशपात्रतेसंदर्भात घातलेला हा घोळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला ग्रहण लावणारा आहे. याशिवाय या नोटिफिकेशनमध्ये अन्य त्रुटीसुद्धा आहेत. एआयसीटीई आणि डीटीईने पात्रतेत घातलेली पाच टक्क्यांची तफावत विद्यार्थ्यांना मारक ठरणारी असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.