शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांची बालके पाळणाघरात

By admin | Updated: May 19, 2015 00:15 IST

जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णांच्या सेवेत कुठेही कसूर राहू नये, कर्मचाऱ्यांची तमतरता भासू नये यासाठी विविध ...

विदर्भातील पहिला प्रयोग : कर्मचाऱ्यांचा वेळ व श्रम वाचविण्याचा प्रयत्नअमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णांच्या सेवेत कुठेही कसूर राहू नये, कर्मचाऱ्यांची तमतरता भासू नये यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या बाळांची येथेच सोय व्हावी व बाळ त्यांच्या जवळ रहावा या उद्देशाने येथील वैद्यकीय अधीक्षक अरूण यादव यांच्या मार्गदर्शनात पाळणा घराची निर्मिती करण्यात आली. याचे उद्घाटन राज्याचे अतिरिक्त आरोग्य संचालक अर्चना पाटील यांच्या हस्ते बुधवारी झाले. जिल्हा स्त्री रुग्णालयात शेकडो महिला रुग्ण विविध आजारांवर उपचार घेण्याकरिता दाखल होतात. प्रत्येकांकडे लक्ष पुरविताना रुग्णालयाचे कर्मचारी कमी पडू नये, त्यांची गैरसोय होऊ नये, हा उद्देश प्रशासनाचा आहे. मात्र येथील कर्मचारी संख्या तोकडी असल्याने तसेच काहींचे लहान बाळ असल्यामुळे त्यांना दुपारच्या वेळेत बाळांना भेटावयास जाणे अगत्याचे असते. यादरम्यान त्यांना ये-जा करताना होणारा त्रास, अतिरिक्त वेळही जातो. दरम्यान रुग्णांच्या सेवेत खंड पडून विपरीत घडण्याची शक्यता डोळ्यासमोर ठेवून डफरीनचे वैद्यकीय अधीक्षक अरुण यादव यांनी पाळणाघराची संकल्पना रुजविली. याचे उद्घाटन राज्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक अर्चना पाटील यांच्या हस्ते बुधवार १३ मे रोजी करण्यात आले. यावेळी अकोला विभागाचे उपसंचालक अविनाश लव्हाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक श्यामसुंदर निकम, मेट्रन रुपमाला घाटगे, प्रशासकीय अधिकारी मारोती नेमाडे, दंदे, बालरोगतज्ज्ञ सदावर्ते यांच्यासह रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)येथे गोरगरीब रुग्ण उपचारार्थ मोठ्या प्रमाणात येतात. त्यांना योग्य सेवा प्रदान करताना मनुष्यबळ तोकडा पडू नये म्हणून कर्मचाऱ्यांच्या बालकांची व्यवस्था येथे केल्याने त्यांनाही समाधान लाभल्यास त्याही सेवा देण्यास तत्पर राहतील, हा यामागील उद्देश आहे.- अरुण यादव, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय.पाळणाघराचे उद्देशशासकीय सेवेत गोरगरीब रुग्णांना अहोरात्र सेवा देणाऱ्या परिचारिका व इतर महिला कर्मचारी वृंदांच्या बालकांची योग्य काळजी व संगोपन उपलब्ध करून देणे.तातडीने गरज भासल्यास बालकाला त्याची माता उपलब्ध करून देणे. बालकांचे संगोपन व आहार वेळेत देणे व त्यांची शारीरिक व मानसिक वाढ योग्य होऊन कर्मचाऱ्यांचे बालके सुदृढ राहण्यास मदत व्हावी.बाळ सुरक्षित ठिकाणी व जवळच असल्याने मातेला मानसिक समाधान लाभून तिला आपल्या सेवा अधिक तत्परतेने देण्यास मदत होईल या उद्देशाने वैद्यकीय अधीक्षक अरुण यादव यांनी ही संकल्पना मांडली आहे.