महापालिका निवडणूक वॉर्ड प्रणालीने होणार

By Admin | Updated: September 22, 2015 00:16 IST2015-09-22T00:16:31+5:302015-09-22T00:16:31+5:30

येत्या २०१७ मध्ये फ्रेबुवारी महिन्यात होऊ घातलेल्या अमरावती महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही एक सदस्यीय (वॉर्ड) प्रणालीने घेण्यावर ...

Election ward system of municipality will be done by | महापालिका निवडणूक वॉर्ड प्रणालीने होणार

महापालिका निवडणूक वॉर्ड प्रणालीने होणार

शिक्कामोर्तब : कल्याण- डोंबिवलीची निवडणूक एक सदस्यीय पद्धतीने
अमरावती : येत्या २०१७ मध्ये फ्रेबुवारी महिन्यात होऊ घातलेल्या अमरावती महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही एक सदस्यीय (वॉर्ड) प्रणालीने घेण्यावर राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. पुढील आॅक्टोबर महिन्यात कल्याण- डोंबिवली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही वॉर्ड प्रणालीनेच होत आहे, हे विशेष.
स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका या वॉर्ड अथवा प्रभाग प्रणाली, याबाबत शासनकर्त्यांमध्ये मतभिन्नता होती. परंतु कॅबिनेट मंत्रीमंडळाने यापूर्वी घेतलेल्या बैठकीत महापालिका निवडणुका वॉर्ड प्रणालीनेच घेण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. कायदादेखील तयार करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकांनी मतदार यादीची जुळवाजुळव चालविली आहे. महापालिका निवडणुकीसंदर्भात २०१४ मध्ये राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या बैठकीत एक सदस्यीय प्रणालीनेच निवडणुका घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त, निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. परंतु मध्यंतरी जिल्हा परिषद, नगरपरिषदांचे निकाल हे राज्यातील सत्ताधारी भाजप, सेनेच्या विरोधात गेल्याने एक सदस्यीय प्रणाली ऐवजी बहुसदस्यीय प्रणालीने निवडणुका घेण्याबाबत शासन विचारधीन होते. त्याअनुषंगाने चर्चादेखील करण्यात आली. मात्र एक सदस्यीय प्रणालीने कॅबिनेटच्या बैठकीत झालेला निर्णय बदलविणे अशक्य नसल्याने शासनकर्त्यांनाही दोन पाऊल मागे सरकावे लागले. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात कल्याण- डोंबिवली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही एक सदस्यीय प्रणालीनेच होत आहे. त्यामुळे राज्यभरात होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुका या एक सदस्यीय प्रणालीनेच होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. हल्ली अमरावती महापालिकेत ४३ प्रभागात ८७ सदस्य संख्या असून येत्या काळात ही सदस्य संख्या वाढण्याचे संकेत आहे. मतदार संख्येच्या आधारावर वार्ड संख्येचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. काही महिन्यांपासून प्रभाग की वॉर्ड प्रणालीने निवडणूक, याविषयी निर्माण झालेली गोंधळाची स्थिती आता दूर झाली आहे. (प्रतिनिधी)

वार्ड प्रणालीनेच निवडणूक घेण्याबाबतची तयारी काही महिन्यांपासून सुरु झाली आहे. हीच तरतूद करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने २०१४ मध्ये दिल्या आहेत. कल्याण- डोंबिवली महापालिकेची निवडणूक एक सदस्यीय प्रणालीने होत आहे.
- मदन तांबकेर
निवडणूक अधिकारी, महापालिका.

Web Title: Election ward system of municipality will be done by