शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

आठ मतदारसंघांमध्ये आजपासून धूमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 06:00 IST

जिल्ह्यात अमरावती, बडनेरा, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर व मेळघाट असे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी दर्यापूर मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता व मेळघाट अनुसूचित जमातीकरिता राखीव आहे. उर्वरित सहाही मतदारसंघ हे सर्वसामान्य आहेत.

ठळक मुद्देशुक्रवारपासून दाखल करता येईल उमेदवारी अर्ज : १० हजार अनामत रक्कम, २८ लाख रुपयांची खर्च मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांद्वारे शुक्रवारी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. त्याच दिवशी उमेदवारी अर्जाची उचल व दाखल करता येईल. ४ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असला तरी त्यादरम्यान तीन दिवस सार्वजनिक सुटी असल्याने अर्ज दाखल करण्याला प्रत्यक्षात पाच दिवस मिळणार आहे. शनिवारी पितृपंधरवडा संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या उमेदवारी अर्जाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात अमरावती, बडनेरा, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर व मेळघाट असे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी दर्यापूर मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता व मेळघाट अनुसूचित जमातीकरिता राखीव आहे. उर्वरित सहाही मतदारसंघ हे सर्वसामान्य आहेत. या सहा मतदारसंघांसाठी अनामत रक्कम ही १० हजार रुपये, तर मेळघाट व दर्यापूर या राखीव मतदारसंघांसाठी पाच हजार रुपये आहे. निवडणुकीसाठी एका उमेदवाराला चार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुभा आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला २८ लाखांची खर्चमर्यादा आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवाराच्या निवडणूक खर्चावर आयोगाची करडी नजर राहणार आहे.आठही मतदारसंघांत २६०७ मुख्य मतदान केंद्रे व २१ साहाय्यकारी अशी एकूण २६२८ मतदान केंद्रे आहेत. अचलपूर मतदारसंघातील तीन मतदान केंद्रांच्या नावात बदल झाला, तर धामणगाव रेल्वे मतदारसंघामध्ये १०, मेळघाटात ४ व अचलपूर मतदारसंघात २ मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल झालेला आहे. या निवडणुकीसाठी आठही मतदारसंघांमध्ये २४ लाख ४५ हजार ७६६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १२ लाख ५८ हजार ९९ पुरुष, ११ लाख ८७ हजार ६२५ स्त्री व ४२ इतर मतदारांचा समावेश आहे.अमरावती मतदारसंघात एसडीओ तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात उमेदवारी अर्जाची प्रक्रिया राहील. बडनेरा मतदारसंघासाठी भातकुली तहसीलदारांच्या कक्षात, धामणगाव मतदारसंघासाठी चांदूर रेल्वे एसडीओ कार्यालयात, तिवसा मतदारसंघासाठी तिवसा तहसीलदार कार्यालयात, मेळघाट मतदारसंघासाठी धारणी एसडीओ कार्यालयात, दर्यापूर मतदारसंघासाठी दर्यापूर एसडीओ कार्यालयात, अचलपूर मतदारसंघासाठी अचलपूर एसडीओ कार्यालयात व मोर्शी मतदारसंघासाठी मोर्शी एसडीओ तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दररोज ३ वाजेपर्यंत सादर करता येणार आहे.भारतीय रेव्हेन्यू सेवेतील तीनऑब्झर्व्हरआठ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारी खर्चावर नजर ठेवण्यासाठी तीन ऑब्झर्व्हर राहणार आहेत. यामध्ये धामणगाव रेल्वे, बडनेरा व अमरावती मतदारसंघाकरिता आसाम राज्यातील आयआरएस रामकृष्ण कुंदा, मेळघाट आणि अचलपूर मतदारसंघाकरिता पश्चिम बंगालचे आयआरएस अरूप चॅटर्जी आणि तिवसा, दर्यापूर व मोर्शी मतदारसंघाकरिता केरळ राज्यातील आयआरएस जॉर्ज जोसेफ हे ऑब्झर्व्हर राहणार आहेत.उमेदवारी अर्जाला मिळणार पाच दिवस२७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्जाची उचल तसेच सादर करण्याची प्रक्रिया प्रारंभ होणार आहे. मात्र, २८ तारखेला सर्वपित्री अमावस्या व चौथा शनिवार आहे. त्यानंतर २९ ला रविवार आहे तसेच मंगळवारी गांधी जयंती आहे. त्या तीन सुट्या आल्यामुळे उमेदवारी अर्ज सादर करण्याला फक्त पाच दिवस मिळणार आहे. यामध्येही शनिवारी पितृपंधरवडा संपत असल्याने सोमवारपासून अर्जाची धूम राहणार आहे.पर्यावरणानुकूल सामग्री वापरण्याचे आवाहननिवडणुकीच्या प्रचारादरम्यान सिंगल यूज प्लास्टिक वापरू नये, पोस्टर, बॅनर, कटआऊट, होर्डिंग, कटलरी, पाण्याचे पाऊच किंवा बाटल्या प्लास्टिकच्या असतील, तर त्यामुळे पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे पर्यायी साधनांचा वापर करावा, असे आवाहन आयोगाने केले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019