शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

समाज ऋणाच्या उत्तराईसाठी आलो शिक्षण क्षेत्रात

By admin | Updated: May 22, 2016 00:11 IST

लहानपणापासूनच समाजासाठी काहीतरी विशेष करावे, असे वाटत होते.

प्रवीण पोटे : पीआर पोटे ग्रुप आॅफ इंन्स्टिट्युटमधील विद्यार्थ्यांचा गौरवअमरावती : लहानपणापासूनच समाजासाठी काहीतरी विशेष करावे, असे वाटत होते. शिक्षणक्षेत्रात गेले नऊ वर्षे कसे गेले हे कळलेच नाही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व समाजाच्या उत्तरदायीत्वासाठी शिक्षणक्षेत्रात आपणं कार्य करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.ते येथील सांस्कृतिक भवन येथे शनिवारी पीआर पोटे पाटील ग्रृप आॅफ इन्स्टिट्यूशनतर्फे आयोजित आॅफर लेटर डिस्ट्रीब्युशन समारंभाप्रसंगी बोलत होते. यावेळी पालकंमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास चर्चा केली. ते म्हणाले, चांगला विद्यार्थी घडावा तो देशाचा चांगला नागरिक व्हावा यासाठी वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना शिक्षा केली असेल त्याला प्रसादही मिळाला असेल. परंतु आज जे महाविद्यालयातून विद्यार्थी घडत आहेत त्यांना देशातील व विदेशातील अनेक नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळत आहे. ज्या विद्यार्थ्याला सहजस्थितीत नोकरीची गरज नसेल त्यांनी प्रशासकीय सेवेकडे वळावे व अमरावतीच्या मातीचे नाव मोठे करावे महाराष्ट्रात चांगले बदल घडवून आणायचे असेल तर या मातीतील विद्यार्थी पुढे आले पाहिजे. यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पीआर पोटे ग्रुपचे उपाध्यक्ष दिलीप निंभोरकर, संचालक डि.जी. वाकोडे, प्राचार्य एस.डी. वाकोडे, उपप्राचार्य महंमद झुयर, मोनिका उपाध्य आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी यावेळी पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मागदर्शन करून देशाचे चांगले नागरिक होण्याचे आवाहन त्यांनी केले. २३९ विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत रोजगाराची संधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. यावेळी या विद्यार्थ्यांना आॅफर लेटर डिस्ट्रीब्यूशन देऊन गौरविण्यात आले. यावेळी अनेक प्राध्यापकांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सागर सोनखासकर, स्नेहा पांडे, आभार प्रशांत ठोंबरे यांनी केले. यावेळी सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)मी दहावीत सहावेळा शाळा बदलणारा नामवंत विद्यार्थी माझे शिक्षण अतिशय मजेशीर झाले. विरंगुळा करीत ना. पोटे म्हणाले, वडिलांच्या नोकरीच्या बदलीमुळे का होेईना दहावीत शिक्षण घेताना सहा शाळा बदलाव्या लागल्या. नंतर मी सातारा येथे सैनिकी स्कूलमध्ये शिकलो. असा मी नामवंत विद्यार्थी होतो. आज हा विद्यार्थी महाराष्ट्रात नामवंत ठरला आहे. यावर उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले. जिद्द व चिकाटीने आपणही कुठलेही यश संपादन करू शकता, असा मौलिक सल्ला व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा संदेशच त्यांनी उपस्थिताना दिला.