लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दर्यापूर तालुक्यातील आमला येथील डीएचएमएस डॉक्टरकडून अॅलोपॅथी औषधांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला. या प्रकरणात त्या डॉक्टरविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. त्या डॉक्टराने ज्या औषधविक्रेत्याकडून तो माल खरेदी केला, त्याच्यावरसुद्धा कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती एफडीए अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय बोगस डॉक्टरांना औषध पुरविणाºया घाऊक व किरकोळ विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम एफडीए हाती घेणार आहे.डीएचएमएस ही पात्रता धारण करणारे डॉ. शांतीलाल उपाध्याय यांच्या दवाखान्यातून एफडीए अधिकाºयांनी २७ हजारांची अॅलोपॅथीची औषधी जप्त केली. त्यांनी तो औषधाचा माल कोठून आणला, याबाबत अद्याप माहिती दिली नाही. त्यांना एफडीएकडून नोटीस बजावण्यात आली असून, तीन दिवसांच्या आत डॉ. उपाध्याय यांना नोटीसचे उत्तर द्यावे लागणार आहे. होमिओपॅथी प्रमाणपत्र असताना दवाखान्यात विनापरवाना अॅलोपॅथी औषधाचा साठा ठेवल्याप्रकरणात डॉ. उपाध्याय यांच्याविरुद्ध न्यायालयीन खटलासुद्धा दाखल केला जाणार आहे. डॉ. उपाध्याय यांनी ज्या घाऊक किंवा किरकोळ औषध विक्रेत्यांकडून माल खरेदी केला, त्याची नावे उघड होताच एफडीएकडून कारवाई केली जाणार आहे. औषधविक्री करणाºया व्यावसायिकांनी खरेदीदाराकडून मागणीपत्र घेणे आवश्यक असते. मात्र, मागणीपत्राविनाच काही व्यावसायिक औषधविक्री करीत असल्याची बाब एफडीएच्या चौकशीत पुढे आली आहे. विनापरवाना व विनापावती औषधविक्री करणाºया व्यावसायिकांची तपासणी एफडीए लवकरच हाती घेणार असून, बोगस डॉक्टर व विनापरवाना अॅलोपॅथी औषधाची साठवणूक करणाऱ्या डॉक्टरांवर आता एफडीएकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.येथून आणले जाते औषधजिल्ह्यातील काही डॉक्टर विनापरवाना दर्यापूर, अंजनगाव सुर्जी तसेच मध्य प्रदेशातूनही औषधांची खरेदी करीत असल्याचे आढळून येत आहे. अमरावती शहरातही औषधविक्रीची मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यामुळे बोगस डॉक्टर व डीएचएमएस असताना अॅलोपॅथीचा उपचार करणारे डॉक्टर या ठिकाणांवरून औषध खरेदी करीत असावे, असा कयास एफडीएचा आहे.त्या डीएचएमएस डॉक्टरावर फौजदारी खटला दाखल करण्यात येईल. त्यांनी औषध कोठून खरेदी केले, ही बाब अद्याप स्पष्ट केली नाही. ते स्पष्ट झाल्यावर संबंधित औषध विक्रेत्यांवरही कारवाई केली जाईल.- चंद्रमणी डांगे, औषधी निरीक्षक, एफडीए.
औषध पुरवठादार कारवाईच्या कक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:25 IST
दर्यापूर तालुक्यातील आमला येथील डीएचएमएस डॉक्टरकडून अॅलोपॅथी औषधांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला. या प्रकरणात त्या डॉक्टरविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. त्या डॉक्टराने ज्या औषधविक्रेत्याकडून तो माल खरेदी केला, त्याच्यावरसुद्धा कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती एफडीए अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय बोगस डॉक्टरांना औषध पुरविणाºया घाऊक व किरकोळ विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम एफडीए हाती घेणार आहे.
औषध पुरवठादार कारवाईच्या कक्षेत
ठळक मुद्देखटला दाखल होणार : बोगस डॉक्टरांना औषध पुरविणारेही एफडीएचे टार्गेट