शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव धांडे येथे दिवाळी!

By admin | Updated: September 21, 2014 23:43 IST

आदिवासी समाजाच्या एकत्रिकरणासोबतच अतिशय हलाखीच्या स्थितीत स्वत:च्या कुटुंबाला उच्चशिक्षित करणारे सतीश दीनबाजी उईके जिल्हा परिषदेचे २९ वे अध्यक्ष म्हणून विजयी झाले आणि तालुक्यातील

मोहन राऊत - अमरावतीआदिवासी समाजाच्या एकत्रिकरणासोबतच अतिशय हलाखीच्या स्थितीत स्वत:च्या कुटुंबाला उच्चशिक्षित करणारे सतीश दीनबाजी उईके जिल्हा परिषदेचे २९ वे अध्यक्ष म्हणून विजयी झाले आणि तालुक्यातील त्यांच्या बोरगाव धांडे गावात त्यांच्या समर्थकांनी रविवारी दिवाळी साजरी केली. बचत गटातील महिलांसह गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावात फटाक्यांची आतषबाजी केली.सतीश उईके यांनी वयाच्या अवघ्या १५व्या वर्षांपासून आदिवासी समाजाच्या एकत्रिकरणासाठी लढा उभारला. हे काम करीत असताना त्यांनी स्वार्थाचा कधीच विचार केला नाही. तालुक्यातील देवगाव जि.प. सर्कलमधील बोरगाव धांडे हे त्यांचे मूळ गाव. घरी अठराविश्वे दारिद्रय. त्यामुळे विटांच्या भट्टीवर काम करण्याची वेळ बालवयातच त्यांच्यावर आली.लग्नानंतरही त्यांनी विटांच्या पजाव्यावर काम केले. आर्थिक विपन्नावस्था असूनही त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नेहमीच सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना उच्चशिक्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच प्रयत्नांनी मोठी मुलगी वैशाली शिक्षक झाली असून लहानी रुपालीसुध्दा धामणगावच्या गोयनका विद्यालयात शिक्षिका आहे. तसेच मुलगा अंकुश एमए पारंगत आहे. लहान मुलगा गौरवचे शिक्षण सुरू आहे. त्यांचे वडील दीनबाजी उईके सरपंच होते. यंदा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने काँग्रेसतर्फे त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. त्यांच्या विजयाची वार्ता गावात पसरताच तालुक्यात जल्लोष साजरा करण्यात आला. तळागाळातील सच्चा कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेच्या तख्तावर विराजमान होण्याचा सन्मान मिळाल्याने गावकऱ्यांनी गुलालाची उधळण करुन जल्लोष साजरा केला. देवगाव सर्कलने पुन्हा आपले राजकीय अस्तित्व या निवडणुकीत दाखवून दिले आहे.