शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र, राज्य शासनाविरोधात जिल्हा काँग्रेसची निदर्शने

By admin | Updated: October 28, 2015 00:29 IST

केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी अच्छे दिनचे आमिष दाखवीत जनतेची मते घेणाऱ्या भाजपा सरकारने कधी नव्हे एवढी महागाई सर्वसामान्य जनतेवर लादली आहे.

आंदोलन : जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढीचा निषेधअमरावती : केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी अच्छे दिनचे आमिष दाखवीत जनतेची मते घेणाऱ्या भाजपा सरकारने कधी नव्हे एवढी महागाई सर्वसामान्य जनतेवर लादली आहे. शेतकऱ्यांनाही वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे डाळीसह जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर आणि वाढते भारनियमन बंद करून अखंडित वीजपुरवठा करावा यासाठी मंगळवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा सरकार विरोधात निदर्शने केलीत. वाढलेली महागाई आटोक्यात आणून शासकीय स्वस्तधान्य दुकानातून माफक दरात डाळीचा पुरवठा करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.केंद्रात आणि राज्यात सत्तेत येताच एका वर्षातच गरीब, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लावून बड्या उद्योजकांच्या तिजोऱ्या भरण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. योजना केवळ गरीब व सर्वसामान्यांसाठी राबवीत असल्याचा देखावा करून गरिबांना जीवनावश्यक वस्तूमध्ये मध्ये एका वर्षातच अव्याढव्य भाववाढ केल्याचे वास्तव आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच जनतेचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. याशिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर कोसळलेले संकट सर्वश्रृत आहे. असे असतानाच ट्रॉन्सफार्मर जळण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी वीज पुरवठा वेळीअवेळी खंडित होत आहे. ही विदारक स्थितीत भाजपा सरकारमुळे ओढवल्याचा आरोप जिल्हा ग्रामीण काँग्रेसने केला आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्यानिमित्त स्वस्त धान्य दुकानातून माफक दरात डाळींचा पुरवठा करावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे निवेदनाव्दारे केले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, जि.प. अध्यक्ष सतीश उईके, गिरीश कराळे, अरूणा गोरले, सरिता मकेश्वर, दीपा लेंडे, ज्योती आरेकर, रजंना उईके, मोहन सिंगवी, गणेश आरेकर, प्रवीण घुईखेडकर, बापुराव गायकवाड, महेंद्रसिंग गैलवार, विलास पवार, सुधाकर भारसाकळे, प्रमोद दाळू, सुरेश आळे, भानुदास चोपडे, भागवत खांडे, र्कैलास आवारे, श्रीराम नेहर, संजय वानखडे, हिरालाल मावस्कर, अवधूत हरणे, बिटू मगरोळे, वसंत देशमुख संजय मापले, प्रदीप देशमुख, बबलू बोबडे, राजू कुरेशी, गजानन पुरी, किशोर देशमुख, बंडू देशमुख, दयाराम काळे, हेमंत येवले व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)