शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
4
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
5
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
6
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
7
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
8
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
9
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
10
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
11
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
12
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
13
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
14
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
15
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
16
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
17
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
18
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
19
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
20
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू अभियानात जिल्हा माघारला

By admin | Updated: November 17, 2014 22:43 IST

जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळावे, त्यांचा आर्थिक स्तर सुधारावा यासाठी कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियान राबविले जाते. परंतु या अभियानाचा दर्जा घसरल्यामुळे

शासन उद्देशाला हरताळ : लोकसहभागाअभावी निधी अखर्चितजितेंद्र दखने - अमरावतीजिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळावे, त्यांचा आर्थिक स्तर सुधारावा यासाठी कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियान राबविले जाते. परंतु या अभियानाचा दर्जा घसरल्यामुळे हे अभियान जिल्ह्यात माघारले आहे. या अभियानासाठी शासनाकडून ३ कोटींहून अधिक निधी उपलब्ध आहे. परंतु शेतकऱ्यांकडून मिळणारा हा निधी अद्यापही अखर्चित आहे. अमरावती जिल्ह्यात कोरडवाहू शेती अभियानासाठी नऊ तालुक्यांतून १३ गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये कोरडवाहू क्षेत्र आहे आणि उपाययोजना केल्या तरी सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही, असे क्षेत्र नेहमीसाठीच कोरडवाहू राहते. या क्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी ही योजना राबविली जाते. सन १३-१४ पासून शासनाने कोरडवाहू शेती अभियान उपक्रम सुरू केला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यामार्फत हे अभियान राबविण्यात येते. शासनाकडून ज्या गावांची निवड या अभियानासाठी केली आहे, त्या गावांमध्ये दरवर्षी विविध योजनांवर १ कोटी रुपये खर्च केला जातो. यामध्ये तीन वर्षांत एका गावावर साधारणत: ३ कोटी रुपयांचा खर्च होतो. अभियानाच्या माध्यमातून जवळपास सहा प्रकारचे उपक्रम राबविले जातात. मनुष्यबळ विकास कार्यक्रम, गटसंघटन, सिंचन प्रक्रियेमध्ये तुषार व ठिबक सिंचन, प्राथमिक कृषी प्रक्रिया यांत्रिकीकरण अशा उपक्रमांचा समावेश आहे. यासाठी ज्या गावांची निवड झाली तेथील शेतकऱ्यांना ५० टक्के लोकसहभाग नोंदविणे आवश्यक आहे. जिल्ह्याला गेल्या वर्षी कोरडवाहू अभियानासाठी १ कोटी ९१ लाख रुपये प्राप्त झाले होते. ही पूर्ण रक्कम खर्च करण्यात आली. यंदा या उपक्रमासाठी ३ कोटी ११ लाख रुपये प्राप्त झाले असून यापैकी ३४ लाख रुपये खर्च झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.