शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

१९ कोटींच्या अनुदानाचे तालुक्यांना वितरण

By admin | Updated: September 22, 2015 00:30 IST

जिल्ह्यात मागील अतिवृष्टी व पुरामुळे काही भागांत शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

गतवर्षीचे नुकसान : शेती पिकांच्या नुकसानीचे ४४ लाख मिळणारलोकमत विशेषअमरावती : जिल्ह्यात मागील अतिवृष्टी व पुरामुळे काही भागांत शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच काही भागात गारपीट होवून पिके बाधित झाली होती. तांत्रिक कारणामुळे आपादग्रस्तांना हा निधी वाटप होऊ शकला नव्हता. याबाबत १९ कोटी ३ लाख १९ हजारांचे अनुदान जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना २१ सप्टेंबरला वाटप करण्यात आले. जिल्ह्यात २२, २३ व २७ जुलै २०१५ मध्ये झालेली अतिवृष्टी, धरणाचे पाणी सोडल्यामुळे नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचे झालेले नुकसानीची मदत जिल्ह्यात यापूर्वीचे वाटप करण्यात आली. मात्र खरडून गेलेल्या जमिनीकरीता राज्य शासनाने ३० जानेवारी २०१४ चे आपत्कालीन मदतीच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील ९ तालुक्यांना ४ कोटी ४२ लाख ८ हजारांचे अनुदान सोमवारी वितरित करण्यात आला.जून ते सप्टेंबर २०१३ दरम्यान अतिवृष्टीत खरडून गेलेल्या शेत जमिनीच्या नुकसानीचा निधी यापूर्वी वाटप केला होता. यामधील वाटप राहिलेला १५ लाख ११ हजार ५०० रुपयांचा निधी सोमवारी वाटण्यात आला. यंदा १ व २ जानेवारीला अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले. यासाठी १३ एप्रिलचे शासन निर्णयानुसार अचलपूर तालुक्यात १ लाख ३१ हजार २५० रुपये व दर्यापूर तालुक्यात ३ लाख ५१ हजार २५० रुपयांच्या निधी सोमवारी वितरीत केला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात एप्रिल २०१५ मध्ये अवकाळी पावसाचे नुकसान झाले होते. याविषयी ३ लाख ७५ हजार ७०० रुपयांचा निधीदेखील सोमवारी वितरित करण्यात आला. २०१३ मधील उर्वरित निधीचे वितरणजिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०१३ मध्ये अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या निधी यापूर्वीच वाटप करण्यात आला.यामध्ये बाकी राहिलेला १ कोटी ५१ लाख ५०० हजारांचा निधी वितरित करण्यात आला. यामध्ये नांदगाव तालुक्याला ११ लाख २ हजार ५०० रुपये चांदूरबाजारला २ लाख ५ हजार, अंजनगाव सुर्जीला २० लाख ४ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.