शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी अनुपस्थित राहिल्यास आता शिस्तभंगाची कारवाई

By admin | Updated: March 9, 2015 00:43 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहून २४ तास

रुग्णांचे हाल थांबणार : आरोग्य सहसंचालकांचे आदेश राजेश मालवीय ल्ल धारणीप्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहून २४ तास आरोग्य सेवा द्यावी लागणार आहे. मुख्यालयी गैरहजर आढळल्यास आता कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश सहसंचालक आरोग्य सेवा यांनी दिले आहेत. इतकेच नव्हे तर मेळघाटात मुख्यालयी न राहता दांडी मारणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवरही कारवाईचे संकेत मिळत आहे.शासनाने गैरआदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन एमबीबीएस व एका बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्याची आणि आदिवासी भागात प्रत्येकी एक-एक एमबीबीएस व बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहून सेवा देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशांचे उल्लंघन होत असल्याने रात्री-बेरात्री केंद्रात येणाऱ्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो. उपचाराअभावी कित्येक रूग्णांचा मृत्यू होतो. या प्रकाराची आरोग्य विभागाने गांभीर्याने दखल घेऊन मुख्यालयी उपस्थित न राहणाऱ्या राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह, उपकेंद्रे, भरारी पथकातील वैद्यकीय अधिकारी, निमवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्याबाबतचा अहवाल महिन्याकाठी आरोग्य सेवा संचालनालय व उपसंचालकांना पाठविण्याचे आदेश सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेषत्वाने मेळघाटातील आरोग्य केंद्रांमध्ये मुख्यालयी गैरहजर राहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांना अद्ययावत सेवा मिळेल. शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या वाढवावी, कामाचे तास निश्चित करावेत. महाराष्ट्र वगळता अन्य राज्यात कामाचे तास निर्धारित आहेत. अन्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही सवलती आहेत. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोणतीही सवलत नाही.- रवींद्र आंडे,वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र, कळमखार.