शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाच्या तिजोरीतून पगार थेट खात्यात

By admin | Updated: September 11, 2014 23:10 IST

कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट (सीएमपी) या नव्याने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे राज्य सरकारच्या तिजोरीतून विविध विभागांत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

गतिमानता : सीएमपी प्रणालीचा होणार उपयोगअमरावती : कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट (सीएमपी) या नव्याने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे राज्य सरकारच्या तिजोरीतून विविध विभागांत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. जिल्हा कोषागार कार्यालयातून लवकरच या प्रणालीची जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. लवकरच ही प्रणाली सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लागू होईल. त्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार आता त्यांच्या कार्यालय प्रमुखांऐवजी कोषागार कार्यालयातून केला जाईल. मागील काही दिवसांत शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना तातडीने त्यांचा पगार देण्यासाठी सेवार्थ, शालार्थ, कृषार्थ आदी प्रणाली विकसित झाल्या आहेत. विभागानुसार या प्रणाली कार्यरत असल्या तरी जिल्हा कोषागार कार्यालयाकडून संबंधित कार्यालयप्रमुखांना त्यांच्यासह त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार व अन्य भत्ते तसेच खर्चाच्या देयकांची रक्कम ईएफटी किंवा एनईएटी प्रक्रियाद्वारे दिली जायची. कार्यालयप्रमुख स्वतंत्र धनादेश बँकेला देऊन आरटीजीएसद्वारे ती रक्कम संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खात्यात वळती करीत होते. या प्रक्रियेत दर महिन्याचा पगार देण्यासाठी उशीर होऊ लागल्याने राज्य सरकारच्या अर्थ विभागाने ‘सीएमपी’ ही नवीन प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे पगार प्रक्रिया अधिक वेगवान व सोप्या पद्धतीने राबविली जाईल. या प्रणालीची अंमलबजावणी जिल्ह्यात लवकरच सुरू केली जाणार आहे. (प्रतिनिधी)