शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजूर युनियनची निदर्शने

By admin | Updated: September 4, 2016 00:22 IST

अखिल भारतीय कामगारांचे संपाला पाठींबा म्हणून महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लालबावटा) व महाराष्ट्र राज्य ...

तहसीलवर धडक : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी निवेदनतिवसा : अखिल भारतीय कामगारांचे संपाला पाठींबा म्हणून महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लालबावटा) व महाराष्ट्र राज्य किसान सभा, एसएफआय, डिवायएफआय या संघटनेचेवतीने केंद्र व राज्य सरकारचे कामगार किसान, मजूर विरोधी धोरणाला घेऊन तिवसा तहसील कचेरीवर निदर्शने आंदोलन केले. दोन्ही संघटनेचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. महागाई कमी करा, शेतकऱ्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, शेतमाल खरेदी करण्यासाठी शासनाने यंत्रणा उभी करावी, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करावी, त्याचप्रमाणे शेतमजुरासाठी केंद्रीय कायदा लागू करा, कल्याणकारी मंडळ निर्माण करा, मनरेगाचे कायद्याची योग्य अंमलबजावणी करा, मजुरांना किमान वेतन ३०० रुपये द्या, सर्व गरिबांना ३५ किलो धान्य देण्यासाठी अन्न सुरक्षा कायद्याची जाणीवपूर्वक अंमलबजावणी करा, सर्व बेघर लोकांना घरासाठी जागा मिळण्यासाठी गावठाण विस्ताराची अंमलबजावणी करा, शेतमजुरांसाठी पेन्शनचा कायदा पास करा, या मागण्यांचे निवेदन भारताचे पंतप्रधान यांना तहसीलदार तिवसामार्फत सादर करण्यात आले. या निदर्शने आंदोलनात तिवसा तालुक्यातील शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव दिलीप शापामोहन, किसान सभेचे जिल्हा सचिव महादेव गारपवार, सरला सोळंके, अंकूश वाघ, ओमप्रकाश वाघमारे, बेबी सुरजुसे, अजय गारपवार, प्रफुल निकाळजे, प्रताप अंभोरे, वंदना राऊत, सुनीता मेश्राम, सविता मोरे, राजू सोळंके, सविता सुरजुसे, सुधाकर वऱ्हाडे, संगीता सोळंके, सुनील राऊत, शफीक शहा इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. शेवटी लालबावटा जिंदाबादचे गगनभेदी घोषणा देऊन आंदोलन संपविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)