शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा इर्विन चौकात आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:13 IST

धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, संविधानातील तरतुदीनुसार अंमलबजावणी तातडीने करावी, यासाठी शनिवारी इर्विन चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धनगर समाजातर्फे आक्रोश आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देआंदोलनाद्वारे लक्षवेध : आरक्षण लागू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, संविधानातील तरतुदीनुसार अंमलबजावणी तातडीने करावी, यासाठी शनिवारी इर्विन चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धनगर समाजातर्फे आक्रोश आंदोलन करण्यात आले.
राज्य व केंद्र सरकारने धनगर जमातीला दिलेले अनुसूचित जातीत असलेला समावेश मान्य करून त्याची अंमलबजावणी अद्यापही न केल्यामुळे त्याविरुद्ध धनगर समाजात असंतोष पसरला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल धनगर समाजाच्या उपस्थितीत पक्ष, संघटना, समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या आक्रोश आंदोलनात सहभाग घेतला आहे. केंद्र व राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. त्यामुळे आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आता सरकारने तातडीने निकाली काढावा, यासाठी धनगर आरक्षण आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून धनगर समाजातील विद्यार्थी, तरूण, तरूणी,महिला तसेच मेंढपाळ महिलांनी आरक्षणाचे मागणी कडे सरकारचे लक्ष वेधले. या आंदोलनात खासदार विकास महात्मे, सुनीता महात्मे, संतोष महात्मे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सुरेखा ठाकरे, निखिल ठाकरे, सुरेश उंद्रे, माधुरी धवळे, प्रेमा लव्हाळे, सुभाष गोहत्रे, जानराव कोकरे, अरूण बांबल, हरीश खुजे, अविनाश लव्हाळे, उमेश अवघड, तुषार पाठक, रवींद्र गोरटे, श्याम बोबडे, हरिभाऊ शिंदे, तुकाराम यमगर, गुणवंत कोकरे, नाना कोकरे, शेखर अवघड आदीचा सहभाग होता. यासोबत जिल्हाभरातील धनगर समाज बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते.