लोकशाहीत विजयश्री समस्या निराकरणाची संधी देते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:29 IST2020-12-14T04:29:37+5:302020-12-14T04:29:37+5:30

फोटो पी १३ किरण सरनाईक बाहेरच्या पानासाठी गुरुकुंज मोझरी : मतदानाच्या माध्यमातून मिळालेली विजयश्री खऱ्या अर्थाने समस्या ...

In a democracy, victory gives an opportunity to solve problems | लोकशाहीत विजयश्री समस्या निराकरणाची संधी देते

लोकशाहीत विजयश्री समस्या निराकरणाची संधी देते

फोटो पी १३ किरण सरनाईक बाहेरच्या पानासाठी

गुरुकुंज मोझरी : मतदानाच्या माध्यमातून मिळालेली विजयश्री खऱ्या अर्थाने समस्या निवारण करण्याची आश्वासक संधी उपलब्ध करून देते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचे आमचे संपूर्ण कुटूंब पाईक असून, या स्फूर्तिस्थानावर नतमस्तक होऊन पुढील कार्यकाळासाठी याच ठिकाणावरून ऊर्जा घेऊन शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही नवनिर्वाचित शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी दिली.

निवडणूक जिंकल्यावर रविवारी प्रथमच त्यांनी महासमाधी स्थळावर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे गुरुजी यांनी त्यांचे ग्रामगीता, शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी अध्यात्म विभागप्रमुख राजाराम बोथे, मुरलीधर बोथे, बळवंत येरपुडे गुरुजी, माजी प्राचार्य पी.पी. पाळेकर, प्राचार्य माणिक पाटील, प्रकाश मक्रमपुरे, सुहास टप्पे, मुकुल देशमुख, किशोर आगर, मानवसेवा छात्रालयाचे अरविंद राठोड उपस्थित होते.

------------

Web Title: In a democracy, victory gives an opportunity to solve problems