तिवसाघाट येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:14 IST2021-02-16T04:14:40+5:302021-02-16T04:14:40+5:30

शेंदूरजनाघाट : दोन किलोमीटर अंतरावरील तिवसाघाट येथील प्रवास निवाऱ्याची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रवासी ...

Demand for migrant shelter at Tivasaghat | तिवसाघाट येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी

तिवसाघाट येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी

शेंदूरजनाघाट : दोन किलोमीटर अंतरावरील तिवसाघाट येथील प्रवास निवाऱ्याची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रवासी निवारा तातडीने उभारण्यात यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

तिवसाघाट हे वरूड ते मुलताई मार्गावर असून, वरूड-तिवसाघाट-शेंदूरजनाघाट येथे शेकडो प्रवासी, विद्यार्थी दररोज वरूड, शेंदूरजनाघाट येथे कामानिमित्त जातात. जुलै-आगस्ट महिन्यात संत्रा कलमांचा मोठा व्यापार होत असल्याने या मार्गाने वाहनांची वर्दळ असते. या सर्व प्रवाशांना प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागला. अनेक वर्षांपूर्वी उभारलेल्या प्रवासी निवाऱ्याची अलीकडच्या काळात डागडुजीही करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवासी नाइलाजाने नजीकच्या हॉटेलचा आश्रय घेतात. नवीन प्रवासी निवारा बांधून प्रवाशांची गैरसोय टाळावी, अशी मागणी तिवसाघाट येथील नागरिक करीत आहेत.

Web Title: Demand for migrant shelter at Tivasaghat