महात्मा फुले महाविद्यालयात पदवी वितरण आणि १० गुणवंतांचा सत्कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:11 AM2021-07-21T04:11:24+5:302021-07-21T04:11:24+5:30

वरुड :- श्री शिवाजि शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित स्थानिक महात्मा फुले कला वाणिज्य आणि सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय ...

Degree distribution and felicitation of 10 meritorious students in Mahatma Phule College! | महात्मा फुले महाविद्यालयात पदवी वितरण आणि १० गुणवंतांचा सत्कार !

महात्मा फुले महाविद्यालयात पदवी वितरण आणि १० गुणवंतांचा सत्कार !

Next

वरुड :- श्री शिवाजि शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित स्थानिक महात्मा फुले कला वाणिज्य आणि सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय मध्ये पदवी वितरण आणि १० गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला . यावेळी विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्याचा पूर्ण अभ्याक्रम कसा पूर्ण होईल महत्वाचे आहे असे संस्थाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले.

याकार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री . शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख , तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे , प्राचार्य डॉ . जयवंत वडते , नॅक समन्वयक डॉ . संजय सातपुते , विज्ञान विभाग प्रमुख डॉ . उमेश चौधरी , कला विभाग प्रमुख डॉ . सुनील काळमेघ , वाणिज्य विभाग प्रमुख प्रा . माधुरी उमेकर , यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र संयोजक प्रा . प्रभाकर डोळस , कार्यक्रम समन्वयक डॉ . सुनील कोंडुलकर उपस्थित होते . याप्रसंगी विद्यापीठात मेरिट आलेल्या १० विद्यार्थ्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार आणि पदवी वितरित करण्यात आली . एमए अर्थशास्त्र मध्ये भाग्यश्री खेरडे हिने प्रथम येऊन सुवर्ण पदक मिळविले ., वाणिज्य शाखेतून प्रथम मेरिट आलेली कविता तळखंडकर , तृतीय मेरिट अंकिता मस्की , सातवी मेरिट गायत्री ठाकूर , आठवी मेरिट शुभांगी पाचपोहर , दहावी मेरिट प्रीती ठेंगेवार , , एम ए मराठीमधून तिसरी मेरिट संघमित्रा गाडगे , एमएस्सी संगणक विज्ञान शाखेतून चौथी मेरिट श्रद्धा अकर्ते, तसेच विज्ञान शाखेतून सहावी मेरिट अश्विनी धांडे , आठवी मेरिट स्नेहा आंजीकर यांचा समावेश आहे . या सर्व गुणवंतांचा पदवी , शाल , श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी प्रमुख अतिथी नरेशचंद्र ठाकरे यांनी सांगितले कि विद्यार्थ्याना पुढील भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या . तर अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी कोविद काळात शिक्षकांनी विद्यार्थ्याचे हित जपणे गरजेचे असून अभ्याक्रम पूर्ण करण्याकरिता लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले . गुणगौरव आणि पदवी वितरण कार्यक्रमाचे अबाहसी पद्धतीने प्रक्षेपण करण्यात आले होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जयवंत वडते यांनी करून महाविद्यालयातील गुणात्मक , संशोधनात्मक आणि विकास कार्याचा आढावा घेतला . संचालन प्रा . पंजाब पुंडकर , प्रा . चंदू पाखरे , प्रा . अलका साबळे यांनी तर आभार प्रा . सुनील कोंडुलकर यांनी मानले . कार्यक्रमाला संस्थेचे आजीव सभासद , गुणवंत विद्यार्थी पालक आणि शिक्षक उपस्थित होते .

Web Title: Degree distribution and felicitation of 10 meritorious students in Mahatma Phule College!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.